(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Edava Basheer Dies : पार्श्वगायक एदवा बशीर यांचे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन; धक्कादायक व्हिडीओ आला समोर
Edava Basheer Dies : पार्श्वगायक एदवा बशीर यांचे लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान निधन झाले आहे.
Singer Edava Basheer Death : मल्याळम संगीत जगताने दिग्गज पार्श्वगायक गमावले आहेत. पार्श्वगायक एदवा बशीर (Edava Basheer) यांचे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन झाले आहे. 28 मे 2022 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी एदवा बशीर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे दिग्गजांसह चाहत्यांकडून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
निधन कसे झाले?
शनिवारी केरळात लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान 'माना हो तुम बेहद हसीन' हे हिंदी गाणं सादर करत असतानाच एदवा बशीर व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांना चेरथाला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मल्ल्याळम संगीत विश्वातील एदवा बशीर हे एक मोठे नाव आहे. त्यांनी अनेक मल्याळम सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.
Singer Edava Basheer collapses on stage,dies pic.twitter.com/wxWbi2JTr0
— Bangla Hunt (@BanglaHunt) May 29, 2022
संगीतालय नावाचा म्युझिक ग्रुप केला होता सुरू
एदवा बशीर यांनी अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. त्यांचे अन्नपूर्णेश्वरी हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. चाहत्यांच्या हे गाणं पसंतीस उतरलं होतं. एदवा बशीर यांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. त्यांचा आवाज सातासमुद्रापार पोहोचला आहे. अमेरिका, यूके, युरोप अशा अनेक देशांत त्यांचे चाहते आहेत. त्यांनी संगीतालय नावाचा म्युझिक ग्रुपदेखील सुरू केला आहे. 'वीणा वैकुम' या गाण्याने त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. एदवा बशीर हे संगीत विश्वातील ज्येष्ठ गायक होते. त्यांनी स्वाथी थिरुनल संगीत अकादमीमधून संगीताची शैक्षणिक पदवी घेतली होती.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला शोक व्यक्त
एदवा बशीर यांच्या निधानाबद्दल दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. पार्श्वगायिका के एस चित्रा यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.
संबंधित बातम्या