Aaron Carter Death: गायक-रॅपर आरोन कार्टनचं निधन; वयाच्या 34 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गायक आणि रॅपर आरोन कार्टरनं (Aaron Carter) वयाच्या 34 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आरोन कार्टरच्या निधनानं मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Aaron Carter: प्रसिद्ध गायक आणि रॅपर आरोन कार्टरचं (Aaron Carter) शनिवारी (5 नोव्हेंबर) निधन झालं आहे. त्यानं वयाच्या 34 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आरोन कार्टरचा मृतदेह कॅलिफोर्नियातील (California) त्याच्या घरात संशयास्पद अवस्थेत सापडला. फार कमी वयातच आरोन लोकप्रिय गायक आणि रॅपर झाला. त्यानं वयाच्या 9 व्या वर्षी त्याचा पहिला अल्बम रिलीज केला होता.
आरोन कार्टरचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आहे, याची अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. लॉस अँजेलिस काउंटी शेरिफ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अॅरॉन कार्टरचा मृतदेह कॅलिफोर्नियातील लँकेस्टर येथील त्यांच्या घरी आढळून आला. त्यावेळी त्यांच्या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. तपासानंतर 10.58 च्या सुमारास त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.
7 डिसेंबर 1987 रोजी टॅम्पा, फ्लोरिडा येथे जन्मलेल्या अॅरॉन कार्टरने 1997 मध्ये करिअरला सुरुवात केली. त्यावेळी त्याचा 'क्रश ऑन यू' हा पहिला अल्बम रिलीज झाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा अल्बम 2000 मध्ये रिलीज झाला. आरोन कार्टरने डिस्ने चॅनल आणि निकलोडियन शोमध्ये हजेरी लावली. तो लिझी मॅकगुयर आणि ऑल दॅट! या शोमध्ये सहभागी झाला होता. एक स्पर्धक म्हणून तिने 'डान्सिंग विथ द स्टार्स' या शोच्या सीझन 9 मध्ये भाग घेतला होता.
अभिनेत्री आणि गायिका हिलरी डफनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आरोन कार्टरला श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
