(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pathaan : 'बेशरम रंग' गाण्याबाबत पहिल्यांदाच बोलला शाहरुख; म्हणाला, 'दीपिकासारखी अभिनेत्री...'
पठाण (Pathaan) या चित्रपटामधील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामधील बेशरम रंग या गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.
Pathaan : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटामधील बेशरम रंग (Besharam Rang) आणि झुमे जो पठाण (Jhoome Jo Pathaan) ही गाणी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामधील बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. अनेकांनी हा चित्रपट बॉयकॉट करण्याची देखील मागणी केली होती. आता बेशरम रंग गाण्याबाबत शाहरुखने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला शाहरुख?
यश राज फिल्म्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख पठाण चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शाहरुखला पठाणमधील दीपिकाच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं. यावर शाहरुख म्हणाला, "बेशरम रंग सारखं गाणं करण्यासाठी दीपिकासारखी तोडीची अभिनेत्री हवी असते. केवळ हेच गाणं नाही तर तिने एका अॅक्शन सीनमध्ये एका मुलाला ओढलं आणि मारलं. असे सीन्स करण्यासाठी ती खंबीर आहे. असे कॉम्बिनेशन फक्त दीपिकासारख्या स्टार्समध्येच पाहायला मिळते."
यश राज फिल्म्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
King Khan’s 32-year-old dream comes true as he turns an action hero in Pathaan! Watch all the revelations of @iamsrk as he gears up for the release of his first out and out action film #Pathaan
— Yash Raj Films (@yrf) January 18, 2023
You can’t miss this one! pic.twitter.com/QzRvEZZt3T
पठाण चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार
पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Pathaan Advance Collection: परदेशात 'पठाण' चा डंका; रिलीज होण्याआधीच केली बंपर कमाई