Shah Rukh Khan : शाहरुखला करायचंय मणिरत्नमसोबत काम; म्हणाला,"ट्रेन काय विमानावरही 'छैया छैया'वर थिरकेल"
Shah Rukh Khan on Maniratnam : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नमसोबत काम करण्याची इच्छा आहे. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात त्याने आपली इच्छा व्यक्त केली आहे.
Shah Rukh Khan on Woring With Maniratnam : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. 'पठाण' (Pathaan) सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने 2023 मध्ये धमाकेदार कमबॅक केलं. गतवर्षातील त्याचे 'पठाण','जवान' आणि 'डंकी' हे तिन्ही सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. अशातच आता नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात शाहरुखने दाक्षिणात्य सुपरस्टार मणिरत्नमसोबत (Mani Ratnam) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शाहरुख खानला नुकताच 'इंडियन ऑफ द ईयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्याला दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नमदेखील उपस्थित होते. पुरस्कारानंतर किंग खानने केलेल्या भाषणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
शाहरुखला करायचंय मणिरत्नमसोबत काम
शाहरुखने मणिरत्नम यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. किंग खान म्हणाला,"मी तुम्हाला विनंती करत आहे. कृपया माझ्यासोबत सिनेमा बनवा. तुम्ही सांगितलं तर मी ट्रेन काय विमानावर चढूनही 'छैया छैया'वर थिरकेल".
शाहरुखच्या इच्छेचा मान ठेवत मजेशीर अंदाजात उत्तर देत मणिरत्नम म्हणाले,"तू माझ्यासाठी विमान खरेदी केलंस तर मी तुझ्यासोबत नक्की सिनेमा करेन". यावर शाहरुख म्हणाला,"तुमच्यासाठी विमान खरेदी करण्याचा दिवस जास्त दूर नाही".
शाहरुख खान आणि मणिरत्नम यांनी 'दिल से' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. हा सिनेमा 1998 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. 'दिल से' या सिनेमातील 'छैया छैया' हे गाणं सुपरहिट ठरलं आहे. आजही हे गाणं आवडीने ऐकलं जातं. सुजॉय घोषच्या आगामी सिनेमात शाहरुख खान लेक सुहानासोबत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच विशाल भारद्वाजच्या आगामी सिनेमाचाही तो भाग असणार आहे.
View this post on Instagram
शाहरुखच्या 'डंकी'ची जगभर चर्चा
राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. शाहरुखसह विकी कौशल, बोमन ईरानी, विक्रम कोचर, अनिल ग्रोवर आणि तापसी पन्नू हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रिलीजच्या 22 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर डंकीने 221.77 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 455 कोटींचा गल्ला जमवला आहे.
संबंधित बातम्या