Shah Rukh Khan : शाहरुखचा 'डंकी' ऑस्करच्या शर्यतीत? समोर आली मोठी अपडेट
Dunki Oscar Awards 2024 : सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात असल्याचं म्हटलं जात आहे.
Shah Rukh Khan Dunki Oscar Awards 2024 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कमाई करत आहे. आता हा सिनेमाची ऑस्करसाठी (Oscar Awards 2024) एन्ट्री पाठवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरलं आहे. शाहरुखचे 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' असे तीन सिनेमे 2023 मध्ये प्रदर्शित झाले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासह प्रेक्षकांची मने जिंकण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे.
'डंकी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी सांभाळली आहे. 'डंकी' या सिनेमाची 'ऑस्कर 2024'साठी एन्ट्री पाठवण्याचा निर्माते विचार करत असल्याचं आता समोर आलं आहे.
'डंकी' ऑस्करच्या शर्यतीत?
'डंकी' या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. या सिनेमातील भावनिक आणि विनोदी असलेली या सिनेमाची कथा प्रेक्षकांना भावली आहे. अवैध मार्गाने दुसऱ्या देशात जाणाऱ्या मुलाची गोष्ट 'डंकी' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 96 व्या ऑस्कर अवॉर्ड्समध्ये 'डंकी'ची निर्माते अधिकृत एन्ट्री पाठवू शकतात. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 'डंकी'आधी शाहरुखचा 'पहेली और स्वदेश' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
'डंकी'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला (Dunki Box Office Collection)
'डंकी' या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 220 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातही या सिनेमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. रिलीजच्या 22 दिवसांत जगभरात या सिनेमाने 435.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. 500 कोटींच्या दिशेने या सिनेमाची वाटचाल सुरू आहे.
'ऑस्कर अवॉड्स 2024'कधी असेल?
'ऑस्कर अवॉड्स 2024' हा जगभरातील सिनेप्रेमींसाठी महत्त्वाचा असणारा पुरस्कार सोहळा 11 मार्च 2024 रोजी पार पडणार आहे. 23 जानेवारीला ऑस्करचं नॉमिनेशन होणार आहे. गेल्यावर्षी 'नाटू-नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉन्गचा पुरस्कार मिळाला होता.
शाहरुखचा 'डंकी' ओटीटीवर येणार (Dunki OTT Release)
सिनेमागृहात धमाका केल्यानंतर शाहरुखचा 'डंकी' ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. 'डंकी' हा सिनेमा फेब्रुवारी 2024 मध्ये जियो सिनेमावर रिलीज होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जियो सिनेमाने 'डंकी'चे ओटीटी राईट्स 155 कोटी रुपयांत विकत घेतले आहेत.
संबंधित बातम्या