एक्स्प्लोर

Satish Kaushik Passes Away: मिस्टर इंडिया ते राम लखन; हिट चित्रपटांमध्ये सतीश कौशिक यांनी केलं काम, प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता हरपला

 सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे.त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जाणून घेऊयात सतीश कौशिक यांच्या चित्रपटांबद्दल....

Satish Kaushik Passes Away:  प्रसिद्ध अभिनेते  सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. सतीश यांनी काही विनोदी भूमिका देखील साकारल्या. जाणून घेऊयात सतीश कौशिक यांच्या चित्रपट आणि मालिकांबद्दल....

सतीश कौशिक यांचे चित्रपट

सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या जाने भी दो यारो या चित्रपटात अशोक ही भूमिका साकारली. तसेच  1983 मध्येच रिलीज झालेल्या वो 7 दिन, मासूम, मंडी या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटामधील त्यांनी साकारलेल्या कॅलेंडर या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. मिस्टर अँड मिसेस खिलाडी, क्यू की मैं झूठ नहीं बोलता यांसारख्या चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकरली. अभिनेता गोविंदासोबत अनेक चित्रपटात सतीश यांनी काम केलं. गोविंदा आणि सतीश यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सतीश यांचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगना रनौतनं दिग्दर्शित केलेल्या इमर्जन्सी या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम ही भूमिका साकारली. 

मालिकांमध्ये देखील केलं काम

सतीश यांनी चित्रपटांबरोबरच मालिकांमध्ये देखील काम केले. त्यांनी कथा सागर, मे आय कम इन मॅडम या मालिकांमध्ये काम केलं. तसेच त्यांनी स्कॅम 1992  या सीरिजमध्ये देखील काम केलं. त्यांनी या सीरिजमध्ये मनु मुंद्रा ही भूमिका साकारली होती.  

सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्म हाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते.

बॉलिवूडवर शोककळा 

सतीश कौशिक यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. अनुपम खेर यांनी ट्वीट शेअर करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच अभिनेत्री कंगना रनौतनं देखील सोशल मीडियाद्वारे सतीश यांना श्रद्धांजली वाहिली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Satish Kaushik Passes Away: प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन; अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला शोक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget