Satish Kaushik Passes Away: प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन; अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला शोक
सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Satish Kaushik Death: प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. आता त्यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. एबीपी न्यूजला अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.
सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्म हाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते.
अनुपम खेर यांचे ट्वीट
'मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे!' हे माहित आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असे लिहावे लागेल, हे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती' असं ट्वीट करत अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
कंगनानं शेअर केलं ट्वीट
अभिनेत्री कंगना रनौतनं ट्विटरवर सतीश यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन लिहिलं, 'सकाळी उठल्यावर ही धक्कादायक बातमी कळाली. सतीश हे खूप चांगले अभिनेते आणि दिग्दर्शक होते. आम्हाला त्यांची आठवण येईल. ओम शांती.'
Woke up to this horrible news, he was my biggest cheerleader, a very successful actor and director #SatishKaushik ji personally was also a very kind and genuine man, I loved directing him in Emergency. He will be missed, Om Shanti 🙏 pic.twitter.com/vwCp2PA64u
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 9, 2023
सतीश कौशिक हे अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणामध्ये झाला. त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नाटकांमध्ये काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया चित्रपटामुळे त्यांनी विशेष ओळख मिळाली. तसेच दीवाना मस्ताना, राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: