एक्स्प्लोर
सपना चौधरीचं बॉलिवूड पदार्पण, डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत
सपना चौधरीसोबत विक्रांत आनंद, जुबेर खान, अंजू जाधव आणि साई बल्लाळ प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाच्या ट्रेलरमध्येच सपना चौधरी मारधाड करताना दिसत आहे.
मुंबई : डान्सच्या जोरावर अख्ख्या देशाला पाय थिरकवायला लावणारी अभिनेत्री सपना चौधरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सपनाची मुख्य भूमिका असलेल्या 'दोस्ती के साईड इफेक्ट्स' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सपना डॅशिंग आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
'दोस्ती के साईड इफेक्ट्स' येत्या 8 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सपना चौधरीसोबत विक्रांत आनंद, जुबेर खान, अंजू जाधव आणि साई बल्लाळ प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाच्या ट्रेलरमध्येच सपना चौधरी मारधाड करताना दिसत आहे.
हैदी अली अबरार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा बालपणीच्या चार मित्र-मैत्रिणींभोवती फिरते. आपापली स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास असतो, मात्र एका गैरसमजातून त्यांच्या मैत्रीत फूट पडते.
सपना चौधरी पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी तिने 'वीरे दी वेडिंग' आणि 'नानी की जानू' या सिनेमांमध्ये आयटम साँग्ज केली आहेत. सपना चौधरीने बिग बॉसचं घरही दणाणून सोडलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement