(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Santoor Maestro Pandit Bhajan Sopori : प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन
Santoor Maestro Pandit Bhajan Sopori : प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन झाले आहे.
Santoor Maestro Pandit Bhajan Sopori : जगप्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी (Santoor Maestro Pandit Bhajan Sopori) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संतूर वादक पंडित भजन सोपोरी आजारी होते. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
संतूर वादक शिवकुमार शर्मा आणि आता संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन झाल्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पंडित भजन सोपोरी यांना राष्ट्रीय कालिदास पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. संतूर वादक पंडित भजन सोपोरी हे सोपोरी सुफियाना घराण्यातील होते. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते.
Santoor maestro Bhajan Sopori dies in Gurugram hospital, says family
— Press Trust of India (@PTI_News) June 2, 2022
संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंडित भजन सोपोरी यांना संतूरपासून ते सतारपर्यंत सर्वकाही वाजवता येत होते. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीदेखील घेतली आहे.
संतूरला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात मोलाचा वाटा
संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांनी महान उस्ताद पंडित शंकर पंडित जी यांच्याकडून संगीताचा वारसा घेतला आहे. संतूरला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी 1990 च्या दशकात संतूरसह जगभरात सादरीकरण करण्यास सुरुवात केली होती.
संबंधित बातम्या