एक्स्प्लोर
संजय दत्त कमबॅकसाठी तयार, ‘भूमी’चं शूटिंग सुरु
नवी दिल्ली : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेता संजय दत्त आता नव्या जोमाने सुरुवात करण्यास तयार झालाय. ‘भूमी’ सिनेमाच्या शूटिंगसाठी संजय दत्त आग्र्यात दाखल झालाय. आग्र्यातील एका पंचतारांकित हॉटेलमघ्ये संजयसाठी खास व्यवस्था करण्यात आलीय.
संजय दत्तची क्रेझ किती आहे, हे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या स्वागतावरुन लक्षात येईल. संजय दत्त आपल्या हॉटेलमध्ये राहायला येणार म्हणून जंगी स्वागत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्याच्या आगमनावेळी प्रसिद्ध ‘तम्मा तम्मा’ हे गाणं वाजवलं गेलं.
अभिनेता संजय दत्तसोबत शेखर सुमनही महत्त्वपूर्ण भूमिका करत आहे. एका टुरिस्ट गाईडच्या भूमिकेत शेखर सुमन असल्याची माहिती मिळतेय.
संजय दत्त आग्र्यात जवळपास दोन महिने शूटिंग करणार आहे. त्यामुळे दोन महिन्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलीय.
संजय दत्त ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आहे, त्या हॉटेलचे जनरल मॅनेजर अभिषेक सहाय यांनी सांगितले की, संजय दत्तच्या फिटनेसनुसार त्याच्या डाएटकडे लक्ष दिलं जाईल. प्रथिनेयुक्त जेवण त्याला दिलं जाईल. त्याच्या पसंतीनुसार गोड पदार्थ बनवले जातील.
‘भूमी’ सिनेमाची शूटिंग आजपासून (15 फेब्रुवारी) झाली आहे. अभिनेता संजय दत्त आणि अभिनेते आदिती हैदर सिनेमात मुख्य भूमिकेत असून, सिनेमाचं दिग्दर्शन उमंग कुमार करत आहेत. तर टी सीरिजची निर्मिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement