Subhedar: सुभेदार चित्रपट पाहिल्यानंतर समीर वानखेडे यांनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाले, 'खरे हिरो...'
Subhedar: समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी एक खास पोस्ट शेअर करुन सुभेदार चित्रपटाचं कौतुक केलं. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Subhedar: 'सुभेदार' (Subhedar) हा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आता समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी देखील नुकतीच एक खास पोस्ट शेअर करुन सुभेदार चित्रपटाचं कौतुक केलं. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
समीर वानखेडे यांची पोस्ट
समीर वानखेडे यांनी काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये दिसत आहे की, थिएटमधील प्रेक्षकांसोबत समीर वानखेडे यांनी संवाद साधला. या फोटो आणि व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'एक महान योद्धा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर अनुयायी असलेले सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारित एक सुंदर मराठी चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक भारतीयाचे ते खरे हिरो आहेत. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे त्यांचे भव्य पेंटिंग मिळवण्याचा मानही मिळाला.' समीर यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
सुभेदार या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तर चिन्मय मांडलेकर हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याचप्रमाणे मृणाल कुलकर्णी,विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, मृण्मयी देशपांडे, भूषण शिवतरे,आस्ताद काळे या कलाकारांनी देखील या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.
‘सुभेदार’ या चित्रपटामधील ‘आले मराठे आले मराठे’ आणि 'मावळं जागं झालं रं...' ही दोन गाणी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळाली आहे.
'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj) या चित्रपटांनंतर आता दिग्पाल लांजेकर यांच्या सुभेदार या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या