Ajay Purkar: 'सुभेदार'नंतर आता अजय पुरकर साऊथ चित्रपटामधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; 'स्कंदा'च्या दिग्दर्शकानं केलं तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ
स्कंदा चित्रपटाचे दिग्दर्शक बोयापती श्रीनू यांनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये अजय पुरकर (Ajay Purkar) यांचे कौतुक केले.
Ajay Purkar: अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांचा 'सुभेदार' (Subhedar) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अजय पुरकर यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. आता अजय पुरकर हे एका साऊथ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव 'स्कंदा' (Skanda) असं आहे. स्कंदा चित्रपटाचे दिग्दर्शक बोयापती श्रीनू यांनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये अजय पुरकर यांचे कौतुक केले.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की बोयापती श्रीनू म्हणतात, 'आता मी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची ओळख करुन देतो. हे आहेत अजय पुरकर सर. हे मराठी रंगभूमीवरील एक उत्कृष्ट कलाकार आहेत. यांनी तान्हाजी मालुसरे यांची व्यक्तीरेखा खूपच चांगल्या रीतीनं साकारली आहे. आपल्या स्कंदा या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल मी आत्ता सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.' पुढे बोयापती श्रीनू म्हणतात, 'आत्ताच त्यांचा सुभेदार हा मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आहे.'
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
स्कंदा हा चित्रपट 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या साऊथ चित्रपटामधील अजय यांचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
सध्या अजय हे सुभेदार या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. सुभेदार चित्रपट अजय यांच्यासोबतच चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी,विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, मृण्मयी देशपांडे, भूषण शिवतरे,आस्ताद काळे या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘सुभेदार’ या चित्रपटामधील ‘आले मराठे आले मराठे’ आणि 'मावळं जागं झालं रं...' ही दोन गाणी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळाली आहे. अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुभेदार या चित्रपटाचं कौतुक करत आहेत.
बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट या चित्रपटांमध्ये देखील अजय पुरकर यांनी काम केलं. अजय पुरकर हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमीच मनं जिंकत असतात.
संबंधित बातम्या