एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलमानची भाची अलिजेह अग्निहोत्री 'दबंग 3'मधून बॉलिवूडमध्ये
सलमानने नुकतंच मध्य प्रदेशात 'दबंग 3' सिनेमाच्या चित्रीकरणाचं पहिलं शेड्यूल पू्र्ण केलं. यावेळी अलिजेह नव्हती, मात्र पुढच्या टप्प्यात ती सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातं.
मुंबई : अभिनेता सलमान खानची भाचीही आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. सलमानची बहीण अल्विरा आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांची कन्या अलिजेह अग्निहोत्रीला 'दबंग 3'मधून लाँच करणार असल्याची माहिती आहे.
सलमानने नुकतंच मध्य प्रदेशात 'दबंग 3' सिनेमाच्या चित्रीकरणाचं पहिलं शेड्यूल पू्र्ण केलं. यावेळी अलिजेह नव्हती, मात्र पुढच्या टप्प्यात ती सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातं.
'दबंग 3' 2020 मधील ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरबाज खानने या सिनेमाची निर्मिती केली असून प्रभूदेवा दिग्दर्शकाच्या खुर्चीत आहे. वॉण्टेडनंतर प्रभूदेवा-सलमानच्या जोडीकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.
VIDEO | सलमान खानच्या धमाकेदार 'भारत'चा ट्रेलर रीलीज | एबीपी माझा
दबंग सीरिजचा पहिला सिनेमा 2010 मध्ये आला होता. त्याचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं होतं. तर दबंग- 2 चं दिग्दर्शन अरबाज खानने केलं होतं.
'दबंग 3'मध्ये चुलबूल पांडेची बायको रज्जो म्हणून सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. दबंगमधून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दबंगच्या तिसऱ्या भागात आयटम साँगमध्ये मलायका अरोरा दिसणार नाही, तर करिना झळकणार असल्याची चर्चा आहे.
सलमान खान इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा गॉडफादर आहे. सलमानने मेव्हणा आयुष शर्माला 'लव्हरात्री' चित्रपटातून लाँच केलं. त्यानंतर मित्र इक्बाल रत्नासी यांचा मुलगा झहीरलाही बॉलिवूडमध्ये आणणार आहे. त्यापाठोपाठ बॉडीगार्ड शेराचा मुलगा टायगरचं लाँचिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement