एक्स्प्लोर
अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमान अव्वल
मुंबई : अॅडव्हान्स टॅक्स भरण्यात बॉलिवूडचा सुलतान सलमान खानने अक्षय कुमार आणि हृतिक रोशनला मागे टाकलं आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात सर्वाधिक अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्यांच्या यादीत सलमान खानचं नाव सर्वात वर आहे.
2016-17 या आर्थिक वर्षात सलमान खानने 44.5 कोटी रुपयांचा अॅडव्हान्स कर भरला आहे, जो मागील वर्षापेक्षा फारच जास्त आहे. 2015-16 मध्ये सलमानने 32.2 कोटी रुपये कर भरला होता. या आकडेवारीनुसार, सलमानच्या वार्षिक उत्पन्नात 39 टक्के वाढ झाली आहे.
तर अॅडव्हान्स कर भरण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर खिलाडी अक्षय कुमार आहे. त्याने 29.5 कोटी रुपयांचा अॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. या यादीत सलमान आणि अक्षयनंतर हृतिक रोशनचं नाव आहे. त्याने 25.5 कोटी रुपये अॅडव्हान्स टॅक्स म्हणून भरले आहेत.
हे आकडे 15 मार्च 2017 पर्यंतचे आहेत. अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या टॉप 10 अभिनेत्यांची यादी पाहिली तर सलमान खानने सर्वाधिक कमाई केल्याचं स्पष्ट होतं. मात्र ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या कराची माहिती आयकर विभागाने अजून जाहीर केलेली नाही.
इतकंच नाही तर कॉमेडी किंग कपिल शर्माच्या वार्षिक उत्पन्नातील वाढही आश्चर्यकारक आहे.
जाहीर माहितीनुसार, मागील एका वर्षात कपिलच्या वैयक्तिक उत्पन्नात 206 टक्के वाढ झाली आहे. कपिलने आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये 7.5 कोटी रुपयांचा अॅडव्हान्स टॅक्स भरला आहे.
तर करण जोहर हा बॉलिवूडचा एकमेव असा दिग्दर्शक आहे ज्याने टॉप 10 यादीत स्थान मिळवलं आहे. बॉलिवूड अभिनेत्रीमध्ये दीपिका पादूकोण, आलिया भट आणि करीना कपूर सर्वात पुढे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement