आता दबंग स्टारच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्यालाही कोरोनाची लागण
सोहेल खानच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांच्या दहावर्षीय मुलाला करोनाचा संसर्ग झाला आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानलादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा मुलगा योहान खानलादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
सलमान खानचा 10 वर्षीय पुतण्या योहान खानला कोरोनाची लागण झाली आहे. सोहेल खानची इमारत आता कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सील केली आहे.
करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत, त्या सर्वांची आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केली आहे. या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्या सूपर स्प्रेडर ही ठरू शकण्याची शक्याता सूत्रांनी व्यक्त केली आहे. करीना आणि अमृता यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची बीएमसीने कोरोना चाचणी केली आहे. त्यांच्या रिपोर्ट्सकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. ज्या मध्ये काही मोठ्या बॉलिवूड सूपरस्टारांची नावं असल्याची माहीती मिळत आहे.
महापौर किशोरी पेडणेकरांनीदेखील व्यक्त केला संताप
किशोरी पेडणेकर म्हणाल्या,"बॉलिवूडकरांनी नियम पाळायला हवेत. तसेच राजकिय लोकांनीदेखील नियमांचे पालन करायला हवे. ग्रॅन्ड हयातमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नियम मोडले जात आहेत. बॉलिवूड आणि राजकिय क्षेत्रातील लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा सध्या होम क्वारंटाईन आहेत. दोघींवर पालिकेचं लक्ष आहे. करिना कपूरला दोन लहान मुलं आहेत, तरी इतकं बिनधास्त".
संबंधित बातम्या
बॉलिवूडला कोरोनाचा विळखा, करीनानंतर संजय कपूर आणि सोहेल खानच्या पत्नीला कोरोनाची लागण
बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात? आणखी दोघींना संसर्गाची लागण, इतर सेलिब्रेटींचे अहवाल प्रतिक्षेत
कसा झाला अभिनेत्री करीना कपूरला कोरोना? प्रवक्त्याने सांगितली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha