कसा झाला अभिनेत्री करीना कपूरला कोरोना? प्रवक्त्याने सांगितली माहिती
बॉलिवूड पार्ट्यांमुळे करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन अभिनेत्रींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे असे बोलले जात होते. त्यातच आता करीनाच्या प्रवक्त्याने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
Kareena Kapoor Covid Positive : मुंबई : अभिनेत्री करीना कपूर (Kareena kapoor) आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची (coronavirus) लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी कोरोना नियमांचं पालन न करता अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जातंय. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कातील सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले आहेत. परंतु, आता करीनाच्या प्रवक्त्याने एबीपी माझाला करीनाला नक्की कोरोना कसा झाला याबाबतची माहिती दिली आहे.
बॉलिवूड पार्ट्यांमुळे करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन अभिनेत्रींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे असे बोलले जात होते. त्यातच आता करीनाच्या प्रवक्त्याने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. "संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान करीना खबरदारी घेत होती. घरातून बाहेर पडताना ती अत्यंत काळजी घ्यायची. परंतु, दुर्देवाने ती आपली जवळची मैत्रिण अमृता अरोरासोबत एका डिनर पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे करीनाला कोरोना झाला. या डिनर पार्टीत काही निवडक मित्रांचाही सहभाग होता. विशेष म्हणजे बाहेर जशा चर्चा सुरू आहेत तशी ही पार्टी खूप मोठी नव्हती. या पार्टीत एक आजारी व्यक्ती सहभागी झाली होती आणि त्याला सतत खोकला येत होता. त्याच्यापासूनच करीना आणि अमृताला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधीत व्यक्तीने जबाबदारीचे भान राखून या पार्टीत सहभागी व्हायला नको होते." असे मत करीनाच्या प्रवक्त्याने व्यक्त केले आहे.
अधिक माहिती देताना करीनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "करीनाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तीने तत्काळ स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले. शिवाय सध्या ती पूर्ण खबरदारी घेत आहे आणि कोरोना नियमांचे पालन करत आहे. करीना कपूरला बेजबाबदार समजून तिच्यावर असे आरोप करणे योग्य नाही. ती एक जबाबदार नागरिक असून तिला आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेचीही काळजी आहे."
दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे करीना कपूरच्या प्रवक्त्याने डिनर पार्टीत सहभागी झालेल्या त्या आजारी व्यक्तीचे नाव सांगितले नाही. शिवाय त्या डिनर पार्टीत कोण-कोण सहभागी होते याची अधिकृत माहितीही प्रवक्त्याने दिली नाही. करीना कपूर आणि अमृता अरोरा यांनी हजेरी लावलेली डिनर पार्टी करण जोहरच्या घरी झाली होती. या पार्टीला अभिनेत्री आलिया भट्टसह इतर अनेक लोक उपस्थित होते.
संबंधित बातम्या
Kareena Kapoor Corona Positive: कोरोनाची लागण झाल्यानंतर करिनाची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाली...
Kishori Pednekar taunts Kareena Kapoor : बॉलिवूडमधील जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीने वागले पाहिजे
सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगला कधी भेटली का करीना कपूर?, करीनाने स्वत: सांगितली खास गोष्ट