एक्स्प्लोर
चिमुकल्या आर्ची-परशाचं 'सैराट झालं जी'!
मुंबई : नागराज मंजुळेचा 'सैराट' सिनेमा प्रदर्शित होऊन चार महिने उलटले, मात्र प्रेक्षकांमधील क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. आर्ची-परशाची प्रेमकहाणी अनेकांचा मनात कायम आहे. काही दिवसांपूर्वी 'सैराट'च्या गाण्यावर प्री-वेडिंग व्हिडीओचा ट्रेण्ड होता. त्यातच आता 4-5 वर्षांच्या चिमुरड्यांना घेऊन 'सैराट झालं जी' हे जसंच्या तसं शूट केलं आहे.
गाण्यातील तेच लोकेशन, तेच सीन हूबेहूब या व्हिडीओमध्ये चित्रीत करण्यात आले आहेत. मात्र यातील आर्ची-परशा वेगळे आहेत.
'सैराट'च्या गाण्यांवर प्री-वेडिंग शूटचा ट्रेण्ड
सुयश वाघमारे या तरुणाने चिमुड्यांच्या गाण्याचा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. तर सोहम पिसडूरकरने परशा आणि श्रावणी कापसेने आर्ची साकारली आहे. रुद्र लंगड्या आणि सिद्धेश माने सल्याच्या भूमिकेत दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे 12 ऑगस्ट अपलोड केलेल्या या व्हिडीओला 19 दिवसात तब्बल 2 लाख 10 हजारांहून अधिक व्ह्यूव मिळाले आहेत. बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम मोडणाऱ्या 'सैराट'मधली गाणी प्रत्येकांच्या ओठांवर आहेत. लग्नाची वरात असो किंवा शाळा-कॉलेजचं गॅदरिंग, 'सैराट'चं एकतरी गाण वाजल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होतं नाही. आता प्री-वेडिंग व्हिडीओनंतर आता किड्स व्हर्जनही यू ट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. पाहा व्हिडीओअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement