एक्स्प्लोर
राज्यभरात 'सैराट'चं याड, पुण्यात हाऊसफुल्ल

मुंबई: दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाला अपेक्षेप्रमाणेच आज मोठा प्रतिसाद मिळतोय. अनेक जण सिनेमाचा पहिलाच शो बघण्यासाठी उत्सुक होते. अनेकांनी सकाळी नऊचा शो बुक केला होता. तर आज दिवसभरातील शोही वेगात बुक होत आहेत. पुण्यात आजचे शो जवळपास हाऊसफुल्ल झाले आहेत. तर शनिवार आणि रविवारचे शोही बुक होत आहेत.
रिव्ह्यू : याड लावणारा 'सैराट'
मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक शहरात चाहत्यांनी सिनेमागृहात गर्दी केली आहे. फँड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा सिनेमा आहे. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच सिनेमात रिंकू राजगुरु या उभरत्या अभिनेत्रीनं या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.संबंधित बातम्या
रिव्ह्यू : याड लावणारा 'सैराट'
VIDEO: मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
VIDEO: ख्रिस गेल आणि कोहलीचा 'सैराट' डान्स
VIDEO: उत्सुकता वाढवणारा 'सैराट'चा ट्रेलर
EXCLUSIVE : हलगी वाजवत ‘सैराट’चं पोस्टर रिलीज
नववीत शिकणारी आर्ची, 13 किलो घटवलेला परशा, सारं काही 'सैराट'!
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
राजकारण






















