Anand Mahindra: आरआरआर फेम राम चरणला आनंद महिंद्रा म्हणाले 'ग्लोबल स्टार'; अभिनेता रिप्लाय देत म्हणाला, 'आता भारताची वेळ...'
आरआरआर (RRR) या चित्रपटातील अभिनेता राम चरणचं (Ram Charan) प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी कौतुक केलं आहे.
Anand Mahindra : गेल्या काही महिन्यांपासून आरआरआर (RRR) या चित्रपटाची चर्चा जगभरात होत आहे. एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या या चित्रपटाने भारतातील आणि परदेशातील अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्काराने गौरवण्यात आलं. आता या चित्रपटातील अभिनेता राम चरणचं (Ram Charan) प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी कौतुक केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर करुन राम चरणचं कौतुक केलं.
आनंद महिंद्रा यांचे ट्वीट
राम चरणने काही दिवसांपूर्वी गुड मॉर्निंग अमेरिका या शोमध्ये हजेरी लावली. या शो दरम्यान राम चरणने अनेक विषयांवर चर्चा केली. गुड मॉर्निंग अमेरिका कार्यक्रमाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, "हा माणूस आता ग्लोबल स्टार झाला आहे." या ट्वीटमध्ये त्यांनी 'नाटू नाटू' हा हॅशटॅग लिहिला. तसेच त्यांनी राम चरणला टॅग देखील केलं. आनंद महिंद्रा यांच्या या ट्वीटला राम चरणने रिप्लाय दिला आहे.
राम चरणने दिला रिप्लाय
राम चरणने आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटला रिप्लाय करत लिहिलं, 'थँक्यु सो मच सर! आता भारताची वेळ प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची आहे.'
Thank you so much Sir!
— Ram Charan (@AlwaysRamCharan) February 25, 2023
It’s India’s time now to shine in every field and form 🙏
काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी हैदराबाद येथे ई-कार रेसिंग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक सुपरस्टार, सेलिब्रिटींनी हजेरी लावली. राम चरणनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी राम चरणने नाटू नाटू या गाण्यामधील स्टेप आनंद महिंद्रा यांना शिकवली होती.
आरआरआर चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याने पटकावला. या गाण्यातील ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या डान्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: