Riteish Deshmukh, Genelia D'Souza : रितेश आणि जिनिलियाचा कॉमेडी अंदाज; व्हिडीओ पाहून खळखळून हसाल
जिनिलिया (Genelia D'Souza) आणि रितेश (Riteish Deshmukh) यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया आणि रितेश यांचा खास अंदाज नेटकऱ्यांना बघायला मिळत आहे.
Riteish Deshmukh, Genelia D'Souza : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा (Genelia D'Souza) हे दोघे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात. रितेश आणि जिनिलियाच्या सोशल मीडियावरील व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच जिनिलिया आणि रितेश यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया आणि रितेश यांचा खास अंदाज नेटकऱ्यांना बघायला मिळत आहे.
रितेश आणि जिनिलिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हे दोघे कॉमेडी डायलॉगवर लिप्सिंग करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला 'मुझे पता है तुम मेरे बारे में बुरा सोचती हो' हा डायलॉग ऐकू येतो. या डायलॉगवर 'बुरा? तुम्हारे बारे में सोचता कौन है?' असा रिप्लाय जिनिलिया देते. या व्हिडीओला जिनिलियानं कॅप्शन दिलं, 'माझ्या नवराची मी Awesome बायको आहे - True story' रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
रितेश आणि जिनिलिया यांच्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, 'परफेक्ट बॉलिवूड कपल' तर दुसऱ्या युझरनं या व्हिडीओला कमेंट केली, 'वर्ल्ड बेस्ट जोडी'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
जिनिलिया आणि रितेश यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनी 2003 मध्ये आलेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडले आणि जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. जिनिलिया आणि रितेश यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
काही दिवसांपूर्वी जिनिलिया आणि रितेश यांचा वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटामधील रितेश आणि जिनिलिया यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खाननं कॅमिओ रोल केला आहे.वेड या चित्रपटातील या चित्रपटातील सुख कळले, वेड लावलंय या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: