एक्स्प्लोर

REVIEW : सिक्रेट सुपरस्टार

इन्सिया नावाच्या मुलीची ही गोष्ट. खरं तर गोष्ट खूप वेगळी किंवा खूप स्पेशल अशी नाही पण ती ज्या पद्धतीने मांडलीय त्याला तोड नाही.

आमीर खानने त्याच्या सिनेमांचा एक स्टॅण्डर्ड सेट केलाय.  'लगान'पासून त्याने केलेला प्रत्येक सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय. गोष्ट निवडणं असो वा दिग्दर्शक आमीरने आजवर खेळलेला प्रत्येक डाव यशस्वी झालाय. 'सिक्रेट सुपरस्टार' हा सिनेमासुद्धा त्याला अपवाद नाही. इन्सिया नावाच्या मुलीची ही गोष्ट. खरं तर गोष्ट खूप वेगळी किंवा खूप स्पेशल अशी नाही पण ती ज्या पद्धतीने मांडलीय त्याला तोड नाही. आमीर खान जेव्हा सिनेमा करतो तेव्हा तो दोन गोष्टी बघतो. पहिली म्हणजे कथा आणि दुसरी म्हणजे दिग्दर्शक. त्या कथेला तो दिग्दर्शक न्याय देऊ शकेल याची पुरेपूर खात्री पटेपर्यंत आमीर सिनेमाला हात घालत नाही. पण एकदा खात्री पटली की मग तो दिग्दर्शक जुना आहे की नवीन याचा तो अजिबात विचार करत नाही. अद्वैत चंदनच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय.  धोबी घाट, तारे जमीं पर अशा सिनेमांसोबत अद्वैतचं नाव जोडलं गेलंय. अर्थात निर्मिती सहाय्यक किंवा व्यवस्थापक म्हणून. पण दिग्दर्शक म्हणून त्याने जी मजल गाठलीय ती कमाल आहे. जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर पाहिला होता तेव्हा वाटलं होतं की आमीरने सगळी गोष्ट सांगून टाकलीय पण सिनेमा पाहताना तो ट्रेलरपलीकडचा आहे ते अवघ्या काही मिनिटांत लक्षात येतं. आई आणि मुलीचं नातं, दोघींची स्वप्नं, त्यासाठीचा संघर्ष, लिंगभेद असं बरंच काही या सिनेमात आहे. अर्थात हे सगळं आजवर आलेल्या अनेक सिनेमातून मांडलं गेलंय. त्यामुळे विषयात तसं वेगळेपण नाहीये पण ज्या पद्धतीने ते  सगळं मांडलंय ते अनुभवण्यासारखं आहे. कागदावर लिहिली गेलेली गोष्ट तितक्याच ताकदीने पडद्यावर उतरवली जाईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. आमीरला मात्र ते गणित जमलंय असं नक्कीच म्हणू शकतो. झायरा वसिमच्या अभिनयाबद्दल बोलावं तेवढं कमीच. आमीर खानचा शक्ती कुमार तर भन्नाट आहे. त्यासाठी त्याने घेतलेली मेहनत जाणवते. इन्सियाच्या आईच्या भूमिकेत दिसणारी मेहर विज या सिनेमातली खरी 'सिक्रेट सुपरस्टार' आहे हे सिनेमा पाहाताना जाणवतं. राज अर्जुनने साकारलेला खुनशी बाप खलनायक म्हणून तितक्याच ताकदीने आपल्या समोर येतो. संगीत ही या सिनेमाची सगळ्यात मोठी बाजू. जवळपास आठ गाणी या सिनेमात आहेत. पण ती सगळी कथाप्रवाहात अगदी आपसूकपणे येतात. कुठेही कथेला वरचढ होत नाहीत. अमित त्रिवेदीने त्याची जादू पुन्हा एकदा दाखवून दिलीय. संकलन, सेट्स आणि कॅमेऱ्याच्या बाबतीत 'सिक्रेट सुपरस्टार' कुठेच निराश करत नाही. थोडक्यात हा सिनेमा टाळू नये असाच आहे. या सिनेमाला देतोय साडेचार स्टार्स.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kalyan Crime Update : अत्याचार अन् मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर बारमध्ये...;नराधमाचा व्हिडिओ समोरShirdi : आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती : महाराष्ट्र मंदिर न्याय परिषदABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 25 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्सKalyan Girl Murder News : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केला तसाच विशाल गवळीचाही करा, कल्याणमधील महिलांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
बीडची गुंडागर्दी... जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
Fact Check :राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द
मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 25 प्रवशांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 25 प्रवशांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू
Embed widget