एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सत्यमेव जयते : कष्टमेव जयते

आत्रंकी कथानक, त्याची बोगस ढोबळ मांडणी आणि यंत्रवत काम करणारा मुख्य नायक आणि त्याची नायिका पाहता हा सिनेमा समजून घेणं भयंकर कष्टाचं काम होऊन बसतं. म्हणूनच या सिनेमाचं नाव 'सत्यमेव जयते' न ठेवता 'कष्टमेव जयते' ठेवायला हवं.

मिलाप झवेरीचा 'सत्यमेव जयते' सिनेमा हा तद्दन मसालापट असेल याचा अंदाज आला होताच. मसालेपट काही वाईट नसतात. निखळ मनोरंजन हा त्याचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे त्यात प्रेमगीत, हाणामारी, आयटम साँग, रडारड, विनोदांची पेरणी आदी जिन्नस असतात. हा सिनेमा तसाच असणार ही अपेक्षा होतीच. म्हणजे, टायर फाडून बाहेर येणारा जॉन, जॉच्या मागे लागलेला पोलिस मनोज वाजपेयी हे पाहता शंभर टक्के निखळ मनोरंजन होईल अशी खात्री आपण बाळगतो खरी. पण आपला पुरेपूर भ्रमनिरास होतो. आत्रंकी कथानक, त्याची बोगस ढोबळ मांडणी आणि यंत्रवत काम करणारा मुख्य नायक आणि त्याची नायिका पाहता हा सिनेमा समजून घेणं भयंकर कष्टाचं काम होऊन बसतं. म्हणूनच या सिनेमाचं नाव 'सत्यमेव जयते' न ठेवता 'कष्टमेव जयते' ठेवायला हवं. मुळात सिनेमाची गोष्ट काय? तर मुंबईसारख्या शहरात पोलिसांचे खून होऊ लागतात. हे सगळे पोलिस भ्रष्ट असतात. मग हे खूनसत्र थांबवण्यासाठी सुट्टीवर असलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला बोलावलं जातं. मग तो येतो आणि सुरु होतो खुनी हल्लेखोराला पकडण्याचा ससेमिरा. खुनी सतत त्या पोलिसाच्या टचमध्ये असतो. असं करत तो पोलिसांना मारत सुटतो. याचं पुढे काय होतं, तो खुनी या सगळ्यातून कसा सुटतो, तो नेमका कोण असतो, तो असं का करत असतो या सगळ्याचा उलगडा म्हणजे हा सिनेमा. आता ही गोष्ट वाचायला बरी वाटते. पण ती पडद्यावर मांडताना यात लॉजिक असायलाच हवं. म्हणजे अगदी तंतोतंत लागणारं लॉजिक नको. पण निदान काहीतरी गृहित धरायला हवं. आपण दाखवू ते लोक पाहतील अशी ठाम समजून करुन घेऊन दिग्दर्शकाने सिनेमा बनवला आहे. अगदीच उदाहरण द्यायचं, तर मुंबईत पोलिसांचे खूप पाडणं आता तितकं सोपं राहिलं नाही. बरं. तो पाडतो खून असं गृहित धरुन चालू. पण त्यासाठी आवश्यक गेम यात असायला हवा. तो सहज कुणाच्याही वेषात येतो. बेमालून पोलिस ठाण्यात जाऊन एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला संपवतो. आता तो संपवतो म्हणून आपण मान्य करायचं की हं.. याने संपवलं. बरं. एकदा, दोनदा ठीक आहे. सगळेच खून असे सलग होत राहतात. त्यामुळे हा सगळा खेळ अत्यंत फुसका आणि हस्यास्पद होतो. अत्यंत ढिसाळ पटकथा, त्यात लांबलेले कंटाळवाणे डायलॉग आणि त्यात भरलेला मेलोड्रामा यामुळे सिनेमा कंटाळवाणा होतो. नाही म्हणायला मनोज वाजपेयी यांनी तळमळीने काम केलंय. पण एका पॉईंटनंतर त्यांच्या संवादफेकीचंही कसं हसं होईल याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. जॉन अब्राहम संपूर्ण सिनेमाभर यंत्रवत वावरतो. त्याची गर्लफ्रेंडही तशीच. दिसायला देखणी पण संवाद फेक कमालीची कोरी. त्यातल्या त्यात बरं वाटतं ते दिलबर गाणं ऐकून, पाहून आणि या सिनेमातले मराठी चेहरे पाहून. यात अमृता खानविलकर, गणेश यादव, देवदत्त नागे हे चेहरे वेगवेगळ्या भूमिकांत दिसतात. एकूणात या सिनेमात आनंद देईल असं फार काही नाही. स्वातंत्रदिनी उगाच जीवाला कष्ट न दिले तर उत्तम. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देतो आहोत, केवळ... केवळ एक स्टार.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Embed widget