एक्स्प्लोर
पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली'कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ
मुंबई : येत्या 28 एप्रिलला 'बाहुबली 2' म्हणजेच 'बाहुबली : द कन्क्ल्युजन' हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाहुबलीचा पहिला भाग पुनर्प्रदर्शित करण्याचा घाट निर्मात्यांनी घातला, मात्र प्रेक्षकांनी याकडे सपशेल पाठ फिरवली आहे.
'बाहुबली : द बिगिनिंग'च्या री-रिलिजला पहिल्या तीन दिवसात अवघ्या दोन कोटींचा गल्ला जमवता आला. 'डीएनए' वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 'बाहुबली : द बिगिनिंग' 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाला होता.
'बाहुबली : द बिगिनिंग' हा पहिला भाग दोन वर्षांच्या कालावधीने 7 एप्रिल 2017 ला पुन्हा रिलीज करण्यात आला. 'कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?' या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या भागात मिळणार आहे. मात्र त्यासाठी आतुर झालेल्या प्रेक्षकांना पुन्हा पहिला भाग पाहण्याची इच्छा नसावी.
बाहुबलीचा दुसरा भाग प्रदर्शित होण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला. त्यामुळे पहिला भाग हा एक प्रकारचा रिफ्रेशर ठरणार होता. मात्र बाहुबलीच्या पहिल्या भागाची पारायणं केलेल्या प्रेक्षकांना तो पुन्हा एकदा थिएटर पाहण्याची इच्छा नाही.
... म्हणून 7 एप्रिल रोजी बाहुबलीचा पहिला भाग पुन्हा रिलीज
एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता. बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र यावेळी त्याच्या दहा टक्केही कलेक्शन बॉक्स ऑफिसवर होऊ शकलेलं नाही. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे 'नाम शबाना' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवली नाही. तरीही दुसऱ्या आठवड्याच्या वीकेंडला या सिनेमाला बाहुबलीच्या री-रिलीजच्या पहिल्या आठवड्याच्या वीकेंडपेक्षा जास्त कमाई करता आली. 'नाम शबाना'ने दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत 5.20 कोटी रुपये कमवले आहेत.संबंधित बातम्या
PHOTO: कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…
‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट
रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर
VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement