Raveena Tandon: रवीना टंडनची मुलगी राशा झाली स्कूल ग्रॅज्युएट; अभिनेत्रीनं खास फोटो शेअर करून व्यक्त केला आनंद
राशाचं स्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर रवीनानं (Raveena Tandon) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे.
Raveena Tandon: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानीने नुकतेच तिचे स्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. राशा थडानीने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून (Dhirubhai Ambani International School) शिक्षण घेतलं आहे. राशाचं स्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर रवीनानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे.
रवीनानं राशाच्या बालपणाचे काही फोटो आणि तिचे स्कूल ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रवीनानं या फोटोला 'Time Flies...that’s true' असं कॅप्शन दिलं आहे. रवीनानं शेअर केलेल्या राशाच्या फोटोला अनेकांनी कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नीलम कोठारी, अभिनेता विक्रांत मेसी या कलाकारांनी रवीनानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन राशाला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
राशानं इन्स्टाग्रामवर तिच्या 'ग्रॅज्युएशन-डे'चे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये राशाचे काही मित्र-मैत्रिणी देखील दिसत आहेत. या फोटोला राशानं 'स्कूल आऊट' असं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
रवीना ही सोशल मीडियावर तिच्या कुटुंबासोबतचे फोटो नेहमी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी रवीनाला सिनेसृष्टीतील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले होते.
एबीपी न्यूजच्या मुलाखतीत रवीना म्हणाली की, 'देशाच्या राष्ट्रपतींकडून पद्मश्री पुरस्कार मिळणे, हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. द्रोपदी मुर्मू यांनी मला सांगितले की, त्या माझे चित्रपट पाहतात, हे ऐकल्यानंतर मला खूप छान वाटले. पुरस्कार स्वीकारताना माझे पती अनिल थडानी आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या माझ्या दोन मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप छान वाटलं.'
अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील रवीनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. यामधील तिच्या मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात. रवीनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Raveena Tandon: राष्ट्रपतींकडून पद्मश्री स्वीकारणं हा माझ्यासाठी अद्भुत अनुभव : रवीना टंडन