Raveena Tandon: राष्ट्रपतींकडून पद्मश्री स्वीकारणं हा माझ्यासाठी अद्भुत अनुभव : रवीना टंडन
सिनेसृष्टीतील योगदानासाठी रवीनाला 'पद्मश्री' पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर रवीनानं एबीपी न्यूजच्या मुलाखतीत तिच्या भावना व्यक्त केल्या.
Raveena Tandon On Padma Shri Award : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये रवीनानं काम केले. काही दिवसांपूर्वी रवीनाला सिनेसृष्टीतील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर रवीनानं एबीपी न्यूजच्या मुलाखतीत तिच्या भावना व्यक्त केल्या.
एबीपी न्यूजच्या मुलाखतीत रवीना म्हणाली की, 'देशाच्या राष्ट्रपतींकडून पद्मश्री पुरस्कार मिळणे, हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. द्रोपदी मुर्मू यांनी मला सांगितले की, त्या माझे चित्रपट पाहतात, हे ऐकल्यानंतर मला खूप छान वाटले. पुरस्कार स्वीकारताना माझे पती अनिल थडानी आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या माझ्या दोन मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप छान वाटलं.'
रवीना म्हणाली, 'पुरस्कार घोषित झाल्यानंतर पहिल्यांदा आईशी बोलले'
रवीनाने पुढे सांगितले की, 'मला एका पत्रकाराकडून कळले की मला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. जेव्हा मला ही बातमी समजली तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता की हे खरोखर घडले आहे. पुरस्काराच्या घोषणेनंतर मी पहिल्यांदा आईशी बोलले.'
रवीना सांगितलं की, तिचा मुलगा रणवीरला यापूर्वी पद्मश्री पुरस्काराचे महत्त्व माहित नव्हते. पण नंतर जेव्हा शाळेतील शिक्षकांनी त्याला या पुरस्काराबद्दल सांगितलं तेव्हा त्याला त्याच्या आईबद्दल अभिमान वाटला.
#WATCH | Actor Raveena Tandon receives the Padma Shri from President Droupadi Murmu pic.twitter.com/9BaFYP3TZi
— ANI (@ANI) April 5, 2023
रवीनाला वडिलांची आठवण आली
रवीना म्हणाली की, माझे वडील रवी टंडन हे आता माझ्यासोबत असते तर त्यांना मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, हे पाहून खूप आनंद झाला असता. रवीनाच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.
रवीनाचे चित्रपट
रवीनाने 1991 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात. रवीनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. रवीनाला इन्स्टाग्रामवर 7.4 मिलियन नेटकरी फॉलो करतात. तसेच अनेक जण तिच्या पोस्टला लाइक आणि कमेंट्स देखील करतात.
इतर महत्वाच्या बातम्या: