Rashmika Mandanna : रश्मिका मंदना बॉलिवूडकडे का वळली? कारण सांगताना अभिनेत्री म्हणतेय...
Rashmika Mandanna : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आता बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Rashmika Mandanna : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आता बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी बॉलिवूड चित्रपटात ‘गुडबाय’ या चित्रपटात रश्मिका दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रश्मिकाचा बॉलिवूड चित्रपटांमधील अभिनय पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक झाले आहेत. साऊथ गाजवणाऱ्या रश्मिकाने बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न तिच्या अनेक चाहत्यांना पडला होता. याचे उत्तर आता अभिनेत्रीने स्वतःच दिले आहे.
अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलेल्या रश्मिकाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा स्वतः रश्मिकाने केला आहे. रश्मिकाने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मीडियाशी संवाद साधला. यादरम्यान रश्मिकाने ती बॉलिवूडमध्ये का आली, हे सांगितले.
चाहत्यांसाठी बॉलिवूडमध्ये पदार्पण!
रश्मिका म्हणाली की, मी माझ्या चाहत्यांसाठी बॉलिवूडमध्ये आले आहे. रश्मिकाने (Rashmika Mandanna) मीडियाशी बोलताना सांगितले की, 'मी हिंदी स्क्रिप्ट्स ऐकायला सुरुवात केली, कारण प्रेक्षकांना ते हवे होते. मी बॉलिवूडमध्ये येऊन काम करावे अशी, चाहत्यांची इच्छा होती. मला बॉलिवूडमध्ये काम करताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. त्यानंतर पुष्पा हा चित्रपट आला आणि या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला मिळालेला प्रतिसाद यामुळेच मी आज गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे.’
View this post on Instagram
‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी सुरू झाले होते. काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे सेटवरील पाळीव प्राण्यांसोबत खेळतानाचे फोटो व्हायरल झाले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदना यांच्याशिवाय नीना गुप्ता, एली अविराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि पावेल गुलाटी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘गुडबाय’ हा चित्रपट 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
रश्मिका मंदनाने वाढवलं मानधन!
Koimoi वेबसाईटच्या बातमीनुसार, रश्मिका मंदनाने (Rashmika Mandanna) ‘पुष्पा 2’साठी 4 कोटी रुपये फीची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, हा चित्रपट रिलीज होण्याआधीच रश्मिकाने तिची फी वाढवून तब्बल 5 कोटी केली आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या रश्मिका प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे रश्मिका आपल्या आगामी चित्रपटात झळकावी यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. मात्र, वाढती प्रसिद्धी पाहून अभिनेत्रीने तिचे मानधन देखील वधारले आहे.
हेही वाचा :