Pushpa The Rule : कोट्यवधींचा गल्ला जमवल्यानंतर ‘पुष्पा 2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार शूटिंग सुरु!
Pushpa The Rule : ‘पुष्पा’ चित्रपटानंतर सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) लोकप्रियता अनेक पटींनी वाढली आहे.
![Pushpa The Rule : कोट्यवधींचा गल्ला जमवल्यानंतर ‘पुष्पा 2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार शूटिंग सुरु! Allu Arjun’s Pushpa the rule shooting will start in july 2022 Pushpa The Rule : कोट्यवधींचा गल्ला जमवल्यानंतर ‘पुष्पा 2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार शूटिंग सुरु!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/777188f8fa949d3624d985908857a8f5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pushpa The Rule : अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आणि प्रेक्षकांच्या हृदयातही स्थान निर्माण केले. या चित्रपटाने केवळ दक्षिण बॉक्स ऑफिसवरच नाही, तर हिंदी पट्ट्यातही चांगली कमाई केली. या चित्रपटानंतर सुपरस्टार अल्लू अर्जुनची लोकप्रियता अनेक पटींनी वाढली आहे. आता ‘पुष्पा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन या वर्षी जुलै महिन्यात 'पुष्पा: द रुल'(Pushpa : The Rule) चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे.
एका रिपोर्टनुसार अल्लू अर्जुन जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार निर्मात्यांनी केला आहे.
चित्रपटाची तयारी सुरु!
सध्या ‘पुष्पा 2’च्या स्क्रिप्टवर फायनल काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'पुष्पा 2'साठी यापूर्वीच तीन गाणी तयार करण्यात आली आहेत. खरंतर, आधी पुष्पाला दोन भागात बनवण्याची योजना नव्हती. दोन भागात बनवायचे ठरल्याबरोबर मेकर्सनी आधीच तयार केलेली गाणी ‘पुष्पा 2’साठी राखून ठेवली.
‘पुष्पा’च्या दुसऱ्या भागात समंथा रुथ प्रभूऐवजी दिशा पटानी आयटम साँगमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट आणि लोकेशनवर काम सुरू आहे. शुटिंग सुरू होण्यापूर्वी अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासोबत सुट्टीवर जाणार आहे.
'पुष्पा' चित्रपटाचा पहिला भाग 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तर, दुसरा भाग नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा'चा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक चांगला कसा होईल, यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)