एक्स्प्लोर
रणवीर सिंहबद्दल रणबीर कपूर म्हणतो...
रणबीर कपूरने रणवीर सिंहच्या बाबतीत असं स्टेटमेंट दिलं की ते ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रणवीस सिंह यांच्यात थेट कनेक्शन नाही, पण दीपिका पादूकोणमुळे दोघांचं नाव कायम एकत्र घेतलं जातं. रणबीर कपूर दीपिकाचा एक्स-बॉयफ्रेण्ड होता. तर रणवीर सिंह आता दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. आता हे समीकरण पाहता दोघे एकमेकांना पाहणं, एकमेकांशी बोलणं टाळत असतील, असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं नाही.
रणबीर कपूरने रणवीर सिंहच्या बाबतीत असं स्टेटमेंट दिलं की ते ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. मुंबईत सुरु असलेल्या फिल्म फेस्टिव्हमध्येदरम्यान रणबीर कपूरला इंडस्ट्रीमधला तुझा सध्याचा आवडता अभिनेता कोण आहे असा प्रश्न विचारला. त्यावर रणवीर सिंह माझा आवडता कलाकार असल्याचं रणबीर म्हणाला. तर आलिया भट आवडती अभिनेत्री आणि करण जोहर आवडता दिग्दर्शक असल्याचं त्यांनी सांगितलं.
याआधी रणबीर आणि रणवीर एका चॅट शोवर एकत्र दिसले होते. "आम्ही बेस्ट फ्रेण्ड नाही, पण मला त्याचं काम आवडतं. माणूस म्हणून रणवीर चांगला आहे," असं रणबीर शोमध्ये म्हणाला होता.
रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी 'पद्मावती'च्या तयारीत व्यस्त आहे. यात तो पहिल्यांदाच निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारत आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून 1 डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
तर रणबीर कपूर राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजय दत्तच्या बायोपिकच्या चित्रीकरणात मग्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement