एक्स्प्लोर
Advertisement
शाही विवाह सोहळ्यासाठी रणवीर-दीपिका इटलीला रवाना
इटलीतील लेक कोमोमध्ये 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान रणवीर-दीपिकाचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर बंगळुरुत 23 नोव्हेंबरला भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.
मुंबई : बॉलिवूडचं हॉट कॉपल अर्थात अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची 'लग्नघटिका समीप' आली आहे. इटलीत होणाऱ्या शाही विवाह सोहळ्यासाठी रणवीर आणि दीपिका इटलीला रवाना झाले आहेत.
एमिरेट्सच्या 'ईके 501' क्रमांकाच्या विमानाने रणवीर-दीपिका दुबईमार्गे इटलीला निघाले. रणवीर-दीपिकासोबत त्यांच्या कुटुंबीयांसोबत शुक्रवारी मध्यरात्री रवाना झाले. निघताना मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर चाहत्यांच्या शुभेच्छांचाही त्यांनी स्वीकार केला.
इटलीतील लेक कोमोमध्ये 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान रणवीर-दीपिकाचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर बंगळुरुत 23 नोव्हेंबरला भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.
रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही.
दीपिका आणि रणवीर यांचा पहिला सिनेमा 'रामलीला' 15 नोव्हेंबर 2013 ला प्रदर्शित झाला होता. त्यामुळे ही तारीख दोघांसाठी खास आहे. या सिनेमापासूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. याशिवाय रामलीला सिनेमाला पाच वर्षही पूर्ण होत आहेत. अशा रितीने पहिल्या भेटीची आठवण म्हणून हे दोघे 15 नोव्हेंबरला विवाह करत असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement