(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swatantrya Veer Savarkar Release Date: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; रणदीप हुड्डानं शेअर केला खास व्हिडीओ
लवकरच रणदीपचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच रणदीपनं (Randeep Hooda) जाहीर केली आहे.
Swatantrya Veer Savarkar Release Date: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. 'सरबजीत', 'सुलतान' आणि 'हायवे' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये रणदीपनं काम केलं आहे. आता लवकरच रणदीपचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच रणदीपनं जाहीर केली आहे. तसेच एक खास व्हिडीओ देखील रणदीपनं शेअर केला आहे.
कधी रिलीज होणार 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट? (Swatantrya Veer Savarkar Release Date)
रणदीपनं 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटानं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "अखंड भारत - स्वातंत्र्य वीर सावरकरांचे स्वप्न, भारताचे वास्तव -दूरदर्शी नेत्याला श्रद्धांजली, ज्याची कथा जिवंत गाडली गेली." 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज होत आहे.
रणदीपनं शेअर केला व्हिडीओ
रणदीपनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये "गद्दार? आतंकवादी? हीरो?" असं लिहिलेलं दिसत आहे. तसेच या व्हिडीओच्या शेवटी रणदीपचा, "मुझे गांधी से नहीं, अहिंसा से नफरत है।" हा डायलॉग ऐकू येतो. या व्हिडीओला रणदीपनं कॅप्शन दिलं, "भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन नायक,एक सेलिब्रेटेड होते आणि एक इतिहासातून पुसले गेले. शहीद दिनी इतिहास पुन्हा लिहिला जाईल. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे."
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
रणदीप हुड्डा व्यतिरिक्त अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्यासह अनेक कलाकार 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रणदीपनं केलं आहे.
रणदीप हुड्डा यानं 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी 18 किलो वजन कमी केलं, असं म्हटलं जात होतं. पण याबाबत आता आनंद पंडित यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, रणदीपनं 26 किलो वजन कमी केले आहे. ते म्हणाले, "जेव्हा रणदीप हा माझ्या ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याचे वजन 86 किलो होते. त्या दिवसापासून तो चित्रपटातील या व्यक्तिरेखेचा अभ्यास करु लागला. त्यानं एक खजूर आणि एक ग्लास दूध असा डाएट फॉलो केला. रणदीपनं 4 महिने हा डाएट फॉलो केला"
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने कमी केले 26 किलो वजन; फॉलो केला 'हा' डाएट प्लॅन