Ram Setu Box Office Collection: अक्षयच्या 'राम सेतू'वरही प्रेक्षक नाराज? कमाईतही मोठी घसरण; पाहा दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन
राम सेतू (Ram Setu) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. पण दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईतही मोठी घसरण झाली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं दुसऱ्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Ram Setu Box Office Collection: अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट 26 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. पण दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईतही मोठी घसरण झाली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
पहिल्या दिवशी राम सेतू या चित्रपटानं 15 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. हा चित्रपट जवळपास 3000 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. काही चित्रपट समीक्षकांनी आणि अक्षयच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवर राम सेतूची सुरुवात संथ झाली. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाच्या तुलनेत राम सेतूच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 25-30 टक्क्यांनी घट झाली आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी जवळपास 11 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांमध्ये राम सेतू या चित्रपटानं 26 कोटींची कमाई केली आहे.
राम सेतू या चित्रपटाचं शूटिंग उटी, दमण- दीव आणि मुंबईच्या जवळ झाले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. केप ऑफ गुड होप, अॅमेझॉन प्राइम, एबंडंटिया एंटरटेनमेंट आणि लायका प्रॉडक्शन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता अजय देवगणच्या थँक गॉड या चित्रपटासोबत राम सेतू या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली
नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राम सेतू चित्रपटातील VFX, चित्रपटाचं कथानक, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टीचं कौतुक केलं. चित्रपटात अक्षयनं पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे, ज्याला राम सेतूबाबत संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. थँक गॉड या अजय देवगणच्या चित्रपटासोबत अक्षयच्या राम सेतू चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. राम सेतू या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिषेक शर्मा हे आहेत.
नेटकऱ्यांनी केलं चित्रपटाचं कौतुक
अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राम सेतू या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'हा चित्रपट एका कोड्यावर आधारित आहे. चित्रपटात अक्षयची एनर्जी कमाल आहे.' या युझरनं या चित्रपटाला चार स्टार दिले आहेत. तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारची धमाकेदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. हा मास्टरपीस आहे.'
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: