एक्स्प्लोर
चिंकाराप्रकरणी सलमाननं तुरुंगात जावं, राजस्थान सरकारची भूमिका
नवी दिल्ली: काळवीट शिकारप्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सलमाननं आत्मसमर्पण करावं आणि तुरुगांत जावं, अशी भूमिका राजस्थान सरकारनं आज सर्वोच्च न्यायलयात मांडलीय.
राजस्थान उच्च न्यायालयानं जुलै महिन्यात 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष मुक्तता केली होती. याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन सरकारची भूमिका मांडलीय. त्यामुळे सलमान खानच्या अडचणीत भर पडलीय.
1998 मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 2007 मध्ये सत्र न्यायालयानं सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement