एक्स्प्लोर
लोकलमधील स्टंटबाजी महागात, अनिल कपूरला नोटीस

मुंबई : अभिनेता अनिल कपूरला एका मालिकेसाठी लोकल रेल्वेवर चढून स्टंटबाजी करणे चांगलंच महागात पडलं आहे. पश्चिम रेल्वेने अनिल कपूरला नोटीस धाडली आहे. एका वाहिनीवर अनिल कपूरची मालिका सुरु होत आहे. त्यासाठी अनिल कपूरने चर्चगेट स्टेशनवरुन शुटिंगसाठी परवानगी मागितली होती. त्याला रेल्वेने परवानगी दिली होती. मात्र परवानगी देताना रेल्वेने प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये शुटिंग करण्यास मान्यता दिली होती. पण अनिल कपूरने फुटबोर्डवर चढून, लटकत स्टंटबाजी केली. इतकंच नाही तर चालत्या ट्रेनमधून लटकताना दिसला. त्यामुळे रेल्वेने यावर आक्षेप घेत, त्याला नोटीस पाठवली आहे. रेल्वेच्या छतावरुन, फुटबोर्डला लटकत प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे कारवाई करते. त्यामुळे अनिल कपूरच्या या स्टंटबाजीमुळे तरुणांना प्रोत्साहन मिळू शकतं. म्हणून रेल्वेने अनिल कपूरला नोटीस धाडली आहे. फोटो - लोकलमधील स्टंटबाजी महागात, अनिल कपूरला नोटीस
आणखी वाचा























