Preity Zinta : प्रीती झिंटाने शेअर केला बाळासोबतचा पहिला फोटो
Preity Zinta : जुळ्या मुलांची आई झाल्यानंतर प्रीती झिंटाने पहिल्यांदाच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
Preity Zinta : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) नुकतीच जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रीती झिंटा सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. प्रिती झिंटाने नुकताच सोशल मीडियावर नवजात बाळासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. प्रीती झिंटाने चाहत्यांसाठी तिच्या जुळ्या मुलांपैकी एकाची पहिली झलक शेअर केली आहे. प्रीती झिंटा आणि तिचे पती जेन गुडइनफ सरोगसीद्वारे मुलगा जय आणि मुलगी जियाचे पालक झाले आहेत.
प्रिती झिंटाने मंगळवारी संध्याकाळी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवजात बाळाला कुशीत घेतलेला एक फोटो शेअर केला. नवजात बाळाला हलक्या निळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये गुंडाळले आहे. प्रीतीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचा चेहरा दिसत नसला तरी प्रीती आनंदात दिसत आहे. प्रीतीने फोटो शेअर करत लिहिले आहे,"उबदार कपडे, डायपर आणि बाळ...हे सर्व मला आवडते".
View this post on Instagram
प्रियांका चोप्रानेदेखील प्रीती झिंटाच्या फोटोवर कमेंट केली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने प्रीतीच्या फोटोवर हार्ट इमोजी पाठवला आहे. प्रीती झिंटा गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये सरोगसीद्वारे आई झाली आहे. सोशल मीडियावर पतीसोबतचा एक फोटो शेअर करत प्रीतीने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. प्रीती झिंटाने 1998 मध्ये 'दिल' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर प्रीतीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
संबंधित बातम्या
Preity Zinta Became Mother Of Twins : जय आणि जिया; प्रीतीने दिला जुळ्यांना जन्म
Tejas Release Date: कंगनाचा नवा अवतार! तेजस सिनेमात साकारणार पायलटची भूमिका
Vicky-Katrina Wedding Exclusive : संगीत सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात, बरवाडा फोर्ट विद्युत रोषणाईने झगमगला, खास फोटो एबीपी माझाच्या हाती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha