Salaar Teaser Out : प्रभासच्या 'सालार'चा धमाकेदार टीझर आऊट; अल्पावधीतच मिळाले लाखो व्ह्युज
Salaar Teaser : प्रभासच्या बहुचर्चित 'सालार' या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
![Salaar Teaser Out : प्रभासच्या 'सालार'चा धमाकेदार टीझर आऊट; अल्पावधीतच मिळाले लाखो व्ह्युज Prabhas Salaar Teaser Out salaar teaser prabhas starrer prashanth neel directorial action drama know salaar updates release date Salaar Teaser Out : प्रभासच्या 'सालार'चा धमाकेदार टीझर आऊट; अल्पावधीतच मिळाले लाखो व्ह्युज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/06/bd10bead19aee6687d225c6a0dfbdb191688613669300254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Prabhas Salaar Teaser Out : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आगामी 'सालार' (Salaar) या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'केजीएफ' फेम दिग्दर्शक प्रशांत नीलने (Prashanth Neel) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'सालार'चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
प्रभासच्या 'सालार'चा धमाकेदार टीझर (Prabhas Salaar Teaser)
'सालार' सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीला टीनू आनंद गाडीवर बसलेला दिसत आहे. दरम्यान प्रभासची धमाकेदार एन्ट्री होते. प्रभासचा लूक पाहून अंगावर शहारे येतात. या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. सालारचा टीझर पाहून प्रेक्षकांना 'केजीएफ'ची आठवण येत आहे.
'सालार'चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल
अॅक्शनचा तडका असलेला 'सालार'चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 6 जुलै 2023 रोजी सकाळी 5 वाजता या सिनेमाचा टीझर आऊट करण्यात आला आहे. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससह श्रृती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, ईश्वरी राव आणि श्रिया रेड्डी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
View this post on Instagram
'सालार' कधी होणार रिलीज? (Salaar Release Date)
प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तेलुगू, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली पण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात हा सिनेमा कमी पडला. त्यामुळे आता 'सालार' नक्की किती कमाई करतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'सालार' सिनेमाचा टीझर जाहीर झाल्याचं प्रभासने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितलं आहे. त्याने लिहिलं आहे,"सालारचा टीझर आऊट झाला आहे. तुम्ही अजून पाहिलात की नाही". प्रभासच्या या पोस्टवर बॉक्स ऑफिसचा राजा, प्रभास अण्णा कमबॅक, भारतीय सिनेमांचा राजा". 'सालार'च्या टीझरला युट्यूबवर अल्पावधीतच दोन लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
पाहा टीझर
संबंधित बातम्या
Salaar Teaser: प्रभासच्या सालारचा टीझर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाच्या मेकर्सनं दिली माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)