Pooja Sawant: कसा जोडीदार पाहिजे? पूजा सावंत म्हणते, 'मला असा पार्टनर पाहिजे जो...'
पूजानं (Pooja Sawant) 'कसा जोडीदार पाहिजे?' या प्रश्नाचं उत्तर दिलं. पूजानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
![Pooja Sawant: कसा जोडीदार पाहिजे? पूजा सावंत म्हणते, 'मला असा पार्टनर पाहिजे जो...' Pooja Sawant talks about her future partner in Bhargavi Chirmuley interview Pooja Sawant: कसा जोडीदार पाहिजे? पूजा सावंत म्हणते, 'मला असा पार्टनर पाहिजे जो...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/16/fede4a9cde79186620407ba5e4de0b8e1692170894076259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. पूजा ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. पूजानं नुकतीच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पूजानं 'कसा जोडीदार पाहिजे?' या प्रश्नाचं उत्तर दिलं. पूजानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
काय म्हणाली पूजा?
'कसा जोडीदार पाहिजे?' असा प्रश्न भार्गवी चिरमुलेनं विचारल्यानंतर पूजा सावंतनं सांगितलं, 'मी घरातील मोठी मुलगी आहे. त्यामुळे आधीपासून मी सर्वांना सांभाळत आली आहे. मला असा जोडीदार पाहिजे जो मला सांभाळेल. माझे मूड स्विंग्स, माझा आनंद हे सर्व सांभाळणारा पार्टनर मला पाहिजे. पैसा वैगरे कोणीही, कधीही कमवू शकतं. पण मला असा मुलगा पाहिजे जो मला कधी हर्ट करणार नाही. मी पटकन हर्ट होतं. त्यामुळे ती व्यक्ती अशी असूदेत जी मला कधीही दुखावणार नाही.'
View this post on Instagram
कोणती भूमिका करण्याची इच्छा? असा प्रश्न पूजाला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत पूजा म्हणाली, 'मला ऐतिहासिक भूमिका करायची इच्छा आहे. तसेच मला स्मिता पाटील या खूप आवडतात. त्यांच्या जैत रे जैत या चित्रपटातील भूमिकेसारखी भूमिका मला करायची आहे.'
पूजानं या चित्रपटांमध्ये केलं काम
क्षणभर विश्रांती या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पूजानं पोस्टर बॉय, सतरंगी रे,गोंदण, आता गं बया,नीळकंठ मास्तर, साटं लोटं पण सगळं खोटं, दगडी चाळ, दगडी चाळ 2 या चित्रपटांमध्ये काम केलं.
View this post on Instagram
पूजा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Pooja Sawant: पूजा सावंतच्या फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा; 'पर्पल गर्ल'चा कूल अंदाज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)