एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पद्मावत वाद: जिथं भाजप तिथे करणी सेनेचा धुडगूस
देशभरात जिथं जिथं भाजपचं राज्य आहे, तिथं तिथं पद्मावत चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यासाठी तोडफोड आणि जाळपोळ सुरु आहे.
मुंबई: करणी सेनेची राडेबाजी भाजप सरकारच्या आशीर्वादानं सुरु आहे की काय असा संशय आता येऊ लागलाय.
कारण देशभरात जिथं जिथं भाजपचं राज्य आहे, तिथं तिथं पद्मावत चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यासाठी तोडफोड आणि जाळपोळ सुरु आहे.
काल गुरुग्राममध्ये तर करणीच्या गुंडांनी कहरच केला. शाळेतून घरी परतणाऱ्या मुलांच्या स्कूलबसवर तुफान दगडफेक केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे 10 वर्षाच्या आतली सगळी मुलं स्कूलबसमधील शिक्षकांच्या मागे लपली. काहींना तर घाबरुन रडूही आवरलं नाही.
दगडाच्या भीतीनं अखेर ही मुलं सीटच्या खालच्या जागेत लपून राहिली. अतिशय संतापजनक असलेली ही दृश्यं व्हायरल झाल्यानंतर देशभरातून करणी सेनेच्या भ्याडपणावर जोरदार टीका होतेय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी अद्यापही कुणालाही अटक झालेली नाही.
जिथं भाजपची सत्ता तिथं धुडगूस
गुजरात
- मुख्यमंत्री- विजय रुपाणी
- अहमदाबादमध्ये थिएटरच्या बाहेर तोडफोड,
- संतप्त जमावानं गाड्या जाळल्या
- मनोहरलाल खट्टर, भाजप
- गुरुग्राममध्ये स्कूल बसवर करणी सेनेच्या गुंडांचा
- भ्याड हल्ला,
- आज गुरुग्राममध्ये शाळा बंद
- अनेक शहरांमध्ये जाळपोळ, हिंसाचार
- मुख्यमंत्री- वसुंधरा राजे, भाजप
- जयपूर, उदयपूरमध्ये करणी सेनेच्या गुंडांची तोडफोड
- चित्तोडगढ- महिलांची जौहर करण्याची धमकी
- मुख्यमंत्री शिवराज सिंह, भाजप
- भोपाळसह अनेक शहरांमध्ये करणी सेनेचं हिंसक आंदोलन
- मल्टीप्लेक्स असोसिएशनचा चित्रपट न दाखविण्याचा निर्णय
- योगी आदित्यनाथ, भाजप
- मेरठमध्ये पीवीएस मॉलवर दगडफेक,
- मथुरेसह अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचार
- देवेंद्र फडणवीस, भाजप
- जालन्यात रत्नदीप आणि नीलम थिएटरवर दगडफेक
- मुंबई, पुण्यासह अनेक शहरात मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सला पोलीस छावणीचं रुप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement