(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Little Things Trailer : "लिटिल थिंग्स"च्या शेवटच्या सीजनचा ट्रेलर प्रदर्शित, काही मिनटांतच झाला व्हायरल
"लिटिल थिंग्स"चा चौथा सीजन काव्या आणि ध्रुवच्या नात्यावर भाष्य करणारा असणार आहे.
Little Things Trailer : नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमाने "लिटिल थिंग्स" च्या चौथ्या आणि शेवटच्या सीजनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सीरीजमध्ये मिथिला पालकर आणि धुव्र सहगल मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. "लिटिल थिंग्स"च्या चौथ्या सीजनचे दिग्दर्शन रुचिर अरुण आणि प्रांजल दुआ करणार आहेत. नात्यातील समजूतदारपणा, परिपक्वता आणि बारकाव्यांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न सीरीजमध्ये करण्यात आला आहे. जे खऱ्या आयुष्यातील नाते समृद्ध बनवायला देखील मदत करते.
"लिटिल थिंग्स" मधील प्रवासाविषयी बोलताना मिथिला म्हणाली, लिटिल थिंग्स ही माझी अत्यंत जिव्हाळ्याची वेब सीरीज आहे. काव्या हे पात्रनेहमीच माझ्यासोबत असणार आहे. सीरीजचे दिग्दर्शक, ध्रुव आणि टीमसोबतचा माझा प्रवास अविश्वसनीय ठरला होता. शेवटच्या सीजनने मला पुन्हा एकदा काव्या आणि तिच्या प्रवासाला अनुभवण्याची संधी दिली आहे. प्रेक्षकांना हा सीजनदेखील आवडणार आहे. काव्या आणि ध्रुवच्या नात्यात प्रेक्षकदेखील अडकणार आहेत.
आतापर्यंतच्या सीजनमध्ये मिथिला काव्याच्या भूमिकेतुन तर ध्रुव ध्रुवाच्या भूमिकेतुन दिसून आला होता. लिटिल थिंग्सच्या चौथ्या सीजनची पॉकेट एसेस आणि डाइस मीडियाने निर्मीती केली होती. येणारा चौथा सीजन काव्या आणि ध्रुवच्या नात्यावर भाष्य करणारा असणार आहे.
नात्यातील चढ-उतार लक्षात घेऊन पुढे जाणारा आहे. तरुणांच्या प्रेम प्रकरणात परिपक्व बदल करण्याचा सीरीजमध्ये प्रयत्न करणयात आला आहे. दरम्यान प्रेक्षक ध्रुव आणि काव्याच्या नात्यातील प्रतिबद्धता, महत्तवकांक्षा, घरच्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देताना दिसून येतील.
ध्रुव म्हणतो, "लिटिल थिंग्स ज्यापद्धतीने मोठा होत गेला त्यासोबत मी देखील मोठा झालो आहे. मागील काही वर्षांत सीरीजवर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले त्याचपद्धतीने त्यांनी माझ्यावर देखील केले आहे. ध्रुव आणि काव्या प्रेक्षकांचे इतके प्रेम मिळवू शकले याचा मला आनंद आहे".
सणासुदीला ओटीटी प्लॅटफॉर्म सजणार
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे सिनेमे आणि वेब सीरीज सणासुदीच्या दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'सरदार ऊधम सिंह', 'डिबुक','रश्मि रॉकेट', 'लिटल थिंग्स सीजन 4' अशी या सिनेमांची आणि वेबसीरीजची नावे आहेत.