Nawazuddin Siddiqui Leave OTT: दर्जेदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'नवाजुद्दीन सिद्दीकी'चा ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन सन्यास!
Nawazuddin Siddiqui Reveation: नवाजुद्दीन सिद्दीकीने 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केले होते. या वेबसीरिजमधला नवाजुद्दीनचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.
Nawazuddin Siddiqui Will Never Work On OTT: बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता 'नवाजुद्दीन सिद्दीकी' (Nawazuddin Siddiqui) ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा निर्णय घेत असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत. 2018 साली नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' (Sacred Games) या वेबसीरिजमधून नवाजुद्दीन सिद्दीकीने ओटीटी विश्वात पदार्पण केले होते. या लोकप्रिय वेबसीरिजमधल्या नवाजच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत होते.
या वेबसीरिज गाजवल्या ताकदीच्या अभिनयावर
'नवाजुद्दीन सिद्दीकी'चा 'सेक्रेड गेम्स' दोन भागांत प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सेक्रेड गेम्स' व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकीने 'सीरिअस मॅन' (Serious Men), 'रात अकेली है' (Raat Akeli Hai) आणि 'धूमकेतू' या वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. या वेबसीरिजमधला नवाजचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. पण आता नवाज ओटीटीवर दिसणार नाही हे ऐकताच चाहते दुखावले गेलेत.
Bhai Ka Birthday Song Teaser: Antim सिनेमातील Bhai Ka Birthday गाण्याचा टीजर प्रदर्शित, Salman Khan आणि Aayush Sharma आमने-सामने
ओटीटीचा दर्जा घसरला
नवाजुद्दीनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, मी ओटीटीला कायमस्वरुपी अलविदा करण्याच्या विचारात आहे. ओटीटीवरचे कथानक दिवसेंदिवस वाईट होत चालले आहे. पूर्वीसारखे चांगल्या दर्जाचे कथानक ओटीटीवर आता दिसून येत नाही. निर्मातेदेखील आधीच्याच सीरिजचा पुढचा भाग बनवत असल्याने प्रेक्षकांनादेखील कंटाळा येतो आहे.
'या' कारनाने घेतला ओटीटी सोडण्याचा निर्णय
नवाजुद्दीनने 'सेक्रेड गेम्स' ही वेबसीरिज एक चॅलेंज म्हणून स्वीकारली होती. त्या वेबसीरीज दरम्यान ते खूप उत्साहीदेखील होते. नवीन गोष्टी शिकायला मिळत असल्याने त्यांनी अभ्यासूवृत्तीने सगळं समजूनदेखील घेतलं होतं. पण आताच्या वेबसीरिजमध्ये तसे चित्र दिसून येत नाही. बिघडत चाललेल्या कथानकाचा भाग व्हायला नवाजुद्दीनला आवडत नाही. त्यामुळेच त्यांनी ओटीटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.