(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yusuf Hussein: ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन यांचं निधन, हंसल मेहतांनी दिली माहिती
अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये चरित्र भूमिका उत्तमपणे साकारलेले ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन (Yusuf Hussein Death after corona) यांचं निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
मुंबई : अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये चरित्र भूमिका उत्तमपणे साकारलेले ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन (Yusuf Hussein Death after corona) यांचं निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मृत्यूसमयी ते 73 वर्षांचे होते. हुसेन हे निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांचे सासरे होते.
हंसल मेहता यांनी स्वत: एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली की, कोरोनाची लागण झाल्यानंतर युसुफ हुसैन यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
युसुफ हुसेन यांनी दिल चाहता है, विवाह, धूम 2, क्रिश 3, ओम माय गॉड, शाहिद, रईस, रोड टू संगम अशा अनेक सिनेमांमध्ये चरित्र अभिनेते म्हणून काम केलं आहे. सोबतच त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
युसूफ हुसेन यांचे जावई हंसल मेहता यांनी ट्विटर वर आपल्या सासऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, जेव्हा ते आर्थिक तंगीचा सामना करत होते. त्यांचं करिअर जवळपास संपलं होतं, त्यावेळी हुसेन यांनी खूप मदत केली. मेहता यांच्याकडे शाहिद बनवण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळी यूसुफ हुसेन यांनी तात्काळ एक चेक साइन करुन मदत केली होती. त्यानंतरच सिनेमाचं काम पूर्ण झालं, असं मेहता यांनी म्हटलं आहे.
Filmmaker @mehtahansal confirms news of actor #YusufHussain’s demise and shares an anecdote proving just how great the late actor was - on screen and off screen. May he rest in peace and glory. pic.twitter.com/Cf21Icj0NO
— Filmfare (@filmfare) October 30, 2021
अभिनेते मनोज वाजपेयी यांनी देखील सोशल मीडियावरुन यूसुफ हुसेन यांच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यानं हंसल मेहता आणि त्यांची पत्नी सफीना हुसेन यांचं सांत्वन केलं आहे.
Sad News!!! Condolences to @safeenahusain @mehtahansal & the entire family!!! Rest in peace Yusuf saab🙏 https://t.co/q7CFbbEo95
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) October 30, 2021