एक्स्प्लोर

Movies Based On Prostitution : देहविक्री करणाऱ्या स्त्रियांचे शोषण, व्यापार; 'हिरामंडी' आधी OTT वरील हे सात चित्रपट नक्की पाहा

Movies Based On Prostitution And Red Light Areas : वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या विषयावर याआधीदेखील काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.यातील काही चित्रपट हे कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जातात.

Movies Based On Prostitution And Red Light Areas : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची हिरामंडी ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या वेब सीरिजमध्ये जुन्या काळातील देहविक्री करणाऱ्या महिलांची कथा आहे. यामध्ये वेश्या व्यवसाय आणि रेड लाईट एरियातील वेगवेगळे पैलू समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विषयावर याआधीदेखील काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.यातील काही चित्रपट हे कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जातात. 

चमेली Chameli Movie

2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या चमेली या चित्रपटात करीना कपूरची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात एक विधुर व्यक्ती आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेमधील मैत्रीचे संबंध दाखवण्यात आले. त्याशिवाय, या चित्रपटात समाजाच्या मानसिकतेवरही भाष्य करण्यात आले. 

कुठे पाहता येईल - हॉटस्टार

बेगम जान

 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. अभिनेत्री विद्या बालन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. रेडक्लिफ लाईनमुळे भारत-पाकिस्तानमध्ये फाळणी झाली. या फाळणीच्या वादात अडकलेल्या गावात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची हवेली असते. आपले घर वाचवण्यासाठीचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. 

कुठे पाहता येईल - हॉटस्टार

तलाश  Talaash 

आमिर खान, करीना कपूर आणि राणी मुखर्जी यांच्या या चित्रपटात भूमिका आहे. हा एक सायकोलॉजिकल हॉररपट आहे. या चित्रपटाच्या कथेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या प्रश्नाला अधोरेखित करण्यात आले आहे. 

कुठे पाहता येईल - प्राईम, नेटफ्लिक्स

बीए पास  BA Pass

बीए पास या चित्रपटाची चर्चा झाली होती. पुरुष वेश्या अर्थात जिगालो व्यवसायाकडे वळलेल्या गरजू युवकाभोवती या चित्रपटाची कथा आहे. शिल्पा शुक्ला आणि शादाब कमाल यांच्या भूमिका आहेत. 

कुठे पाहता येईल - प्राईम, नेटफ्लिक्स

 

लक्ष्मी Laxmi 

ही कथा लक्ष्मी नावाच्या एका चिमुरडीभोवती फिरते जिचे अपहरण करून तिला विकले जाते आणि वेश्या बनवले जाते. हा चित्रपट मानवी तस्करी आणि बाल वेश्याव्यवसाय या संवेदनशील विषयावर आधारित आहे.

कुठे पाहता येईल - प्राईम, नेटफ्लिक्स


चांदनी बार Chandani Bar

तब्बू, अतुल कुलकर्णी यांच्या दमदार भूमिका आणि मधुर भांडारकर यांचे दिग्दर्शन असलेला 'चांदनी बार' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच केलीच, शिवाय समीक्षकांकडून कौतुकही मिळवले. तब्बूला या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बारबालांचे जगणे, गुन्हेगारी जगत आणि भ्रष्ट पोलिसांची हातमिळवणी या सगळ्या भोवती चित्रपटाची कथा आहे.

कुठे पाहता येईल - प्राईम, युट्यूब 

मंडी Mandi Movie 

या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते. सर्वांना हा चित्रपट खूप आवडला आणि शबाना आझमी यांनीही यात चमकदार अभिनय केला. 1983 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट  लेखक गुलाम अब्बास यांच्या आनंदी या उत्कृष्ट उर्दू लघुकथेवर आधारित आहे. हा चित्रपट एका शहराच्या मध्यभागी वसलेल्या वेश्यालयाची कथा सांगतो. हा चित्रपट राजकारण आणि वेश्याव्यवसायावर एक व्यंग्यात्मक विनोदी चित्रपट आहे आणि त्यात शबाना आझमी, स्मिता पाटील आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत. 

कुठे पाहता येईल - प्राईम, युट्यूब 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Attended Manish Malhotra Diwali Party 2026: माधुरी दीक्षित होणार सासुबाई? दिवाळी पार्टीत पती आणि लेकासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, VIDEO
माधुरी दीक्षित होणार सासुबाई? दिवाळी पार्टीत पती आणि लेकासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, VIDEO
Ibrahim Khan On Kareena Kapoor Koffee With Karan 9: 'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
Aamir Khan Gauri Spratt Home: आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
Alia Bhatt On Ranbir Kapoor Ramayana: 'मला तुझा खूप अभिमान वाटतोय, रणबीर...'; आलिया भट्टची खास पोस्ट चर्चेत, नवऱ्याचं कौतुक करताना चिमुकल्या लेकीचे क्युट फोटोही शेअर, PHOTOs
'मला तुझा खूप अभिमान वाटतोय, रणबीर...'; आलिया भट्टची खास पोस्ट चर्चेत, नवऱ्याचं कौतुक करताना चिमुकल्या लेकीचे क्युट फोटोही शेअर, PHOTOs

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
NCMC Card ST Bus : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Embed widget