Mumbai Diaries 2 Announced: मुंबई डायरीज-2 चा टीझर आऊट; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार सीरिज? कधी होणार रिलीज? जाणून घ्या सर्वकाही
Mumbai Diaries 2 Teaser: मुंबई डायरीज-2 (Mumbai Diaries 2) या वेब सीरिजचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे.
Mumbai Diaries 2 Announced: मुंबई डायरीज या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची मदत डॉक्टरांनी दिवसरात्र एक करुन केली होती, हे या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये दाखवण्यात आले होते. आता मुंबई डायरीज (Mumbai Diaries 2) या वेब सीरिजमध्ये दुसऱ्या सीझनमध्ये, जोरदार पाऊसामुळे मुंबईमधील लोकांची उडालेली तारांबळ आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी केलेली लोकांची मदत, हे दाखवण्यात येणार आहे.
कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार वेब सीरिज?
भारतात आणि जगभरातील 240 देशांमध्ये मुंबई डायरीज-2 ही वेब सीरिज स्ट्रीम केली जाणार आहे. ही वेब सीरिज 6 ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केली जाणार आहे.
मुंबई डायरीज-2 या वेब सीरिजचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा टीझर दिसत आहे. "मुंबई हिरोज तयार करते. जे वादळापेक्षा देखील बलवान असतात." असं कॅप्शन या टीझरला देण्यात आलं आहे.
पाहा टीझर
View this post on Instagram
मुंबई डायरीज-2 ची स्टार कास्ट
कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma), मोहित रैना (Mohit Raina), टीना देसाई (Tina Desai), श्रेया धन्वंतरी (Shreya Dhanwanthary), सत्यजीत दुबे (Satyajeet Dubey, नताशा भारद्वाज (Natasha Bharadwaj), मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) आणि प्रकाश बेलावाडी (Prakash Belawadi) या कलाकारांनी मुंबई डायरीज-2 या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. मुंबई डायरीज-2 मधील या कलाकरांच्या लूकचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
मुंबई डायरीज-2 ही वेब सीरिज आठ एपिसोड्सची असणार आहे, असं म्हटलं जात आहे. प्रेक्षक या वेब सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या बातम्या :