एक्स्प्लोर
प्रियंकाच्या मराठी सिनेमातील बाप्पाची गाणी रिलीज

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पहिला मराठी सिनेमा 'व्हेंटिलेटर'ची दोन गाणी रिलीज झाली आहेत. प्रियंकाने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. गणेशोत्सवानिमीत्त गाणी रिलीज करता आल्याचा आनंद असल्याचं प्रियंकाने म्हटलं आहे. 'व्हेंटिलेटरची' या रे या सारे या आणि जय देवा ही दोन बाप्पाची जबरदस्त गाणी रिलीज झाली आहेत. गणेशोत्सवात या गाण्यांचा चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. प्रियंकाने ट्विटरवरुन याबद्दलची माहिती दिल्यानंतर ही गाणी मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहेत. https://twitter.com/priyankachopra/status/770841223179309056 प्रियंका चोप्रा या सिनेमाची निर्माती आहे. तर मधू म्हापूस्कर यांनी दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात प्रेक्षकांना मनोरंजनाचा भरपूर मसाला पाहायला मिळेल, अशी माहिती आहे. सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. हा तगडी स्टार कास्ट असणारा सिनेमा असल्याचं बोललं जातं.
आणखी वाचा























