एक्स्प्लोर

Manobala Passes Away: साऊथ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोबाला यांचे निधन; वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेते आणि दिग्दर्शक मनोबाला (Manobala) यांचे निधन झाले आहे.  वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी  अखेरचा श्वास घेतला.

Manobala Passes Away: तमिळ चित्रपटसृष्टीतील  अभिनेते आणि दिग्दर्शक मनोबाला (Manobala) यांचे चेन्नई (Chennai) येथे निधन झाले आहे.  वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी  अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील साळीग्रामम येथील एल.व्ही.प्रसाद रोड येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. दिवंगत मनोबाला यांच्या पश्चात पत्नी उषा आणि मुलगा हरीश असे कुटुंब आहे.

मनोबाला यांच्या निधनानं  तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता-दिग्दर्शक जीएम कुमार आणि रमेश बाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.  

मनोबाला यांनी 450 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं


मनोबाला यांनी त्यांच्या कॉमेडी टायमिंगमुळे  विशेष ओळख निर्माण केली होती. चित्रपटसृष्टीतील 35 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मनोबाला यांनी  1979  मध्ये भारतीराजाच्या पुथिया वरपुगल या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.  

अभिनेत्री  सनम शेट्टीने देखील ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, 'मनोबाला हे ओरिजनल ट्रेंडसेटर, कॉमेडीचे किंग आणि अविस्मरणीय अभिनेता होते. माझ्या पहिल्या कॉमेडी सीनसाठी तुम्ही दिलेल्या टिप्स मला नेहमी आठवतात.'

अभिनेते रजनिकांत यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.

मनोबाला यांनी 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'अगया गंगाई'चित्रपटामधून दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी जवळपास 25 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये 'पिल्लई निला', 'ओरकावलन', 'एन पुरुषांथन एनाक्कू मट्टुमथन', 'करुप्पू वेल्लई', 'मल्लू वेट्टी मायनर' आणि 'परंबरियम' या चित्रपटांचा समावेश आहे.

मनोबाला यांनी काही  मालिकांमध्ये देखील काम केले तसेच त्यांनी अनेक टीव्ही शोचे दिग्दर्शनही केले होते.  2022 मध्ये 'कुकू विथ कोमली' मध्ये  त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 03 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Case: 'जत्रेत गेला होता, 2 महिन्यांपूर्वीच त्याने घर सोडलं...'; टायगर श्रॉफ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
'जत्रेत गेला होता, 2 महिन्यांपूर्वीच त्याने घर सोडलं...'; टायगर श्रॉफ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
Ajinkya Deo on Maherchi Saadi: असंख्य बायकांना रडवणारा चित्रपट 'माहेरची साडी' रिमेक? गुजराती सिनेमाची स्टोरी, अजिंक्य देव यांचा मोठा खुलासा
असंख्य बायकांना रडवणारा चित्रपट 'माहेरची साडी' रिमेक? गुजराती सिनेमाची स्टोरी, अजिंक्य देव यांचा मोठा खुलासा
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ बेछूट गोळीबारानंतरही कसा वाचला? पोलिसांना काय सांगितलं? जुहूतील खळबळजनक घटनेची Inside Story
टायगर श्रॉफ बेछूट गोळीबारानंतरही कसा वाचला? पोलिसांना काय सांगितलं? जुहूतील खळबळजनक घटनेची Inside Story
Lai Bhari Actor Telugu Film Debut: तेलुगु बिग बजेट सिनेमात मराठी सुपरस्टारची एन्ट्री; 'लय भारी' अभिनेत्याचा BTS VIDEO व्हायरल, नव्या अवतारात दिसणार
तेलुगु बिग बजेट सिनेमात मराठी सुपरस्टारची एन्ट्री; 'लय भारी' अभिनेत्याचा BTS VIDEO व्हायरल, नव्या अवतारात दिसणार

व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; नागपुरातील विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Uday Samant on Gokul Election Result 2026: जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा गोकुळ होतं, उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा गोकुळ होतं, उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Embed widget