Entertainment News Live Updates 03 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Brahman Bhushan Puraskar: अभिनेते प्रशांत दामले यांना "ब्राह्मण भूषण" पुरस्कार जाहीर
Brahman Bhushan Puraskar: आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने ब्राह्मण भूषण पुरस्काराचे (Brahman Bhushan Puraskar) आयोजन दरवर्षी केले जाते. यंदा सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी माहिती दिली.
Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' मालिका घेणार प्रेक्षकांना निरोप
Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) ही मालिका गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. वेगळा विषय, वेगळ्या धाटणीची असूनही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडली. त्यामुळे निर्मात्यांनी आता ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' (Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai) या मालिकेचा येत्या काही दिवसांत शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. या मालिकेची जागा अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम घेणार आहे.
Ashok Rane : सिनेमाचे मास्तर! चित्रपट-समीक्षक अशोक राणे यांना यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' जाहीर
Satyajit Ray Memorical Awards Winner Ashok Rane : सिने-समीक्षक अशोक राणे (Ashok Rane) यांना यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' (Satyajit Ray Memorical Awards 2023) जाहीर झाला आहे. सिनेसृष्टीतील लेखनासाठी तसेच चित्रपट समीक्षा लेखन क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल अशोक राणे यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे.
Alia Bhatt Get Mistaken For Aishwarya Rai: मेट गाला इव्हेंटमध्ये फोटोग्राफर्सचं झालं कन्फ्यूजन; आलियाला म्हणाले 'ऐश्वर्या'; व्हिडीओ होतोय व्हायरल
idc what ppl say but alia bhatt literally slayed at the met gala #MetGala pic.twitter.com/4s8C0qPTqk
— MET GALA ERA (@softiealiaa) May 2, 2023
Kon Honar Crorepati : मनासारखं जगायचं असेल, तर आता मागे नाही राहायचं! 'कोण होणार करोडपती' होणार सुरू
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या बहुचर्चित कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. गेल्या महिन्यात या कार्यक्रमाच्या सहभाग प्रक्रियेला सुरुवात झाली होती. एक मिस्डकॉल द्या आणि एक कोटी रुपये जिंका असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला होता.
OTT Release This Week : 'तू झूठी मैं मक्कार' ते 'विक्रम वेधा'; 'या' प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
OTT Release This Week : मे (May) महिन्याचा पहिला आठवडा खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. अॅक्शन, रोमान्स, विनोद अशा वेगवेगळ्या जॉनरच्या कलाकृती या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkar) या सिनेमासह 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) पर्यंत या सिनेमाचा समावेश आहे.
The Kerala Story : '32000 नव्हे फक्त तीन महिलांची गोष्ट"; 'द केरळ स्टोरी'च्या वादावरुन निर्मात्यांनी केला बदल
The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा सध्या खूपच चर्चेत आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला होता. तर दुसरीकडे या सिनेमाचं कथानक खोटं असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाच्या कथानकावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. केरळ सरकारदेखील या सिनेमाला विरोध करत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाच्या कथानकात मोठा बदल करण्यचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला
Maharashtra Shahir Box Office Collection : 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. रिलीजच्या सहा दिवसांत या मराठी सिनेमाने 3.33 कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी (Maharashtra Day 2023) या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.