Mithun Ramesh : मल्याळम अभिनेता मिथुन रमेश रुग्णालयात दाखल; 'या' दुर्मिळ आजाराने ग्रस्त
Mithun Ramesh : मल्याळम अभिनेता मिथुन रमेशला केरळमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mithun Ramesh Hospitalized : दाक्षिणात्य सिनेसृष्टी (South) गाजवणारा मल्याळम अभिनेता मिथुन रमेशला (Mithun Ramesh) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथुनला 'बेल्स पाल्सी' हा दुर्मिळ आजार झाला असून सध्या त्याच्यावर केरळमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'बेल्स पाल्सी' (Bells Palsy) हा अर्धांगवायूचा एक प्रकार आहे. यामध्ये चेहऱ्याच्या काही भागात पॅरालिसिस होतो.
मिथुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना 'बेल्स पाल्सी' या आजाराबद्दल सांगितलं आहे. मिथुन म्हणाला, "मला 'बेल्स पाल्सी' हा दुर्मिळ आजार झाला आहे. त्यामुळे मी माझे दोन्ही डोळे एकत्र बंद करू शकत नाही. त्रिवेंद्रम येथील अनंतपुरी रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू आहेत". अभिनेत्याला 2021 सालीदेखील अर्धांगवायूचा झटका आला होता. मिथुनच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
#BREAKING നടന് മിഥുന് രമേശ് ആശുപത്രിയില്!https://t.co/Zhkc2qc5ek#MithunRamesh #Mithun #hospital #BellsPalsy #ComedyUtsavam #actor #life #Anchor #Malayalam #mollywood #news #entertainment #DHMalayalam #Dailyhunt
— Dailyhunt Malayalam (@DH_Malayalam) March 3, 2023
मिथुन रमेश कोण आहे? (Who Is Mithun Ramesh)
मिथुन रमेशने 2000 साली 'लाइफ इज ब्यूटीफुल' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. छोट्या पडद्यावरील अनेक हलक्या-फुलक्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची धुरा त्याने सांभाळली आहे. 'शेषम','रन बाबू', 'सैम' आणि 'जिमी ई वेदिन्ते ऐश्वर्यम' सारख्या सिनेमांत मिथुन रमेशने काम केलं आहे. रेडिओ कार्यक्रमांमध्ये देखील त्याने सहभाग घेतला आहे. मिथुन रमेश हा मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
View this post on Instagram
मिथुनला झालेल्या 'बेल्स पाल्सी' आजाराबद्दल जाणून घ्या...
'बेल्स पाल्सी' (Bells Palsy) हा अर्धांगवायूचा एक प्रकार आहे. या आजारात चेहऱ्याच्या काही भागाला पॅरालिसिस होतो. 15 ते 60 वर्षांपर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. दर 5000 व्यक्तींत एका व्यक्तीला हा आजार होतो. 'बेल्स पाल्सी' हा गंभीर आजार असून योग्य पद्धतीने उपचार घेतल्यास या आजारावर मात करता येते. या आजावर एकदा मात केल्यानंतर पुन्हा हा आजार होण्याची शक्यता असते.
संबंधित बातम्या