Eisha Chopra: 70 वर्षीय व्यक्तीनं अभिनेत्रीचा केला विनयभंग; ईशा चोप्रा म्हणाली, "सार्वजनिक ठिकाणी..."
Eisha Chopra: ईशान एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ईशानं तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत नेटकऱ्यांना सांगितलं आहे.
Eisha Chopra: ओटीटीवरील 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमुळे अभिनेत्री ईशा चोप्राला (Eisha Chopra) विशेष लोकप्रियता मिळाली. ईशा ही विविध वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. नुकतीच ईशान एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ईशानं तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत नेटकऱ्यांना सांगितलं आहे. ईशाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
ईशा चोप्रा यांची पोस्ट
ईशा चोप्रानं पोस्टमध्ये लिहिलं, "सुमारे 10 दिवसांपूर्वी, एका अनोळखी व्यक्तीने, सार्वजनिक ठिकाणी, लोकांच्या गर्दीमध्ये माझा विनयभंग केला. तो व्यक्ती 70 वर्षांचा होता, त्याने व्यक्तीनं चांगले कपडे घातलेला होता, तो विद्वान दिसत होता. तो माझ्याकडे आला आणि त्याने स्वतःची ओळख करून दिली. त्याने माझ्याशी हात मिळवला, नंतर त्यानं मला त्याच्याजवळ ओढलं. वाटेल तिथे मला तो स्पर्श करत होता. या घटनेमुळे मी काही दिवस शॉकमध्येच होते."
ईशाने सांगितले की, 'सर्व काही इतक्या लवकर घडले की, मी पूर्णपणे शॉकमध्ये गेले. मला काय करावे ते समजत नव्हते. मी 7 वर्षांची असताना पहिल्यांदाच अशा अत्याचाराचा सामना केला होता. मला त्या माणसाचा चेहरा अजूनही आठवतो.' ईशाच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
जाणून घ्या ईशा चोप्राबाबात...
ईशा चोप्राने 'व्हॉट द फोक्स' या सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. तिच्या या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच तिने नुकत्याच रिलीज झालेल्या 'मेड इन हेव्हन' सिरीजमध्येही भूमिका साकारली आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या निरजा या चित्रपटामध्ये देखील ईशानं काम केलं. या चित्रपटात तिनं देबिना ही भूमिका साकारली. ईशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ईशा ही तिच्या आगामी प्रोजक्ट्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांना देते. तिला इन्स्टग्रामवर 327K फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या:
Raveena Tandon : 'लोकल आणि बसमध्ये शारीरिक छळ, छेडछाड....'; अभिनेत्री रविना टंडननं सांगितला अनुभव