Lara Dutta : म्हातारी अन् जाडी दिसतेयस; कमेंट्स करणाऱ्यांना लारा दत्ताचं सडेतोड उत्तर
Lara Dutta : एका मुलाखतीमध्ये लारा दत्तानं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
Lara Dutta Hits Back To Trollers : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) ही लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली. पण काही दिवसांपूर्वीच तिनं कमबॅक केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लाराच्या वेब सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण ट्रोलर्सनं मात्र लाराला ट्रोल केले. एका मुलाखतीमध्ये लारानं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
मुलाखतीमध्ये लाराने सांगितले, 'बॉलिवूडमध्ये काजोल, माधुरी दीक्षित आणि राणी मुखर्जी यांसारख्या खूप चांगल्या अभिनेत्री काम करत आहेत. पण जेव्हा पण आमच्या सारख्या अभिनेत्री स्क्रिनवर येतात, तेव्हा लोक वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट्स करतात. काही लोक म्हणतात, म्हतारी दिसत आहे तर काही म्हणतात, जाड झाली आहेस. सर्वांप्रमाणेच आमचे देखील वय वाढत आहे. नीना गुप्ता, रत्ना पाठक शाह या जास्त वयाच्या अभिनेत्री देखील अभिनय क्षेत्रात खूप चांगलं काम करत आहेत. '
पुढे लारा म्हणाली, 'माझ्या वयाने मला लोकांच्या अपेक्षांपासून दूर केलं आहे. लोकांची अशी अपेक्षा असते की मी ग्लॅमरस दिसले पाहिजे कारण मी मिस यूनिवर्स होते. काही लोक माझ्या वयापेक्षा माझ्यात असणारं टॅलेंट पाहतात. '
View this post on Instagram
बेल बॉटम या चित्रपटातील लाराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात तिनं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.