(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Katrina Kaif Education : घडाघडा इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ कधीच शाळेत जाऊ शकली नाही! नेमकं कारण काय?
Katrina Kaif Education : आपण अनेकदा कतरिना कैफला चित्रपटांमध्ये अस्खलित इंग्रजी बोलताना ऐकले असेल. पण तुम्हाला माहित आहे का की, सर्वांच्या मनावर राज्य करणारी कतरिना कधीच शाळेत गेली नाही.
Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे (Katrina Kaif) नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. लाखो चाहते कतरिनाच्या सौंदर्यावर आणि तिच्या स्टाईलवर घायाळ होतात. पण, सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी कतरिना कैफ किती शिकली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
आपण अनेकदा कतरिना कैफला चित्रपटांमध्ये अस्खलित इंग्रजी बोलताना ऐकले असेल. अनेकांना तिची हीच लकब आवडते. पण तुम्हाला माहित आहे का की, सर्वांच्या मनावर राज्य करणारी कतरिना कधीच शाळेत गेली नाही. कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी होते, तर आई सुझान या देखील ब्रिटिश आहेत.
कसे झाले कतरिना कैफचे शिक्षण?
कतरिना कैफचे बालपण जवळपास 18 देशांमध्ये गेले. कतरिना कैफ सतत प्रवासामुळे कोणत्याही शाळेत जाऊ शकली नाही. मात्र, तिला शिकवण्यासाठी होम ट्यूटर नियुक्त केले गेले होते, जे तिला शिकवण्यासाठी घरी यायचे. कतरिनाने वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. काही वर्षांनी कतरिना मुंबईत आली आणि तिने येथेही आपले मॉडेलिंग करिअर सुरू ठेवले. अभिनेत्री म्हणून ती तिच्या करिअरमध्ये हळूहळू पुढे जात होती आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
कतरिना कैफला तीन मोठ्या बहिणी आणि तीन लहान बहिणी आहेत आणि तिला एक मोठा भाऊ देखील आहे. अभिनेत्रीने हिंदी सोबतच तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात देखील काम केले आहे. गतवर्षाच्या अखेरीस कतरिनाने बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
इतर बातम्या :
- Deepika Padukone Fitness : दीपिकासारखी टोन्ड फिगर हवीये? मग, जाणून घ्या तिचा डाएट आणि वर्कआऊट प्लॅन
- Navya Naveli Nanda : ‘बिग बीं’च्या नातीचा साडी लूक पाहून चाहते झाले घायाळ, ‘मामू’ अभिषेकनेही केले कौतुक!
- Man Udu Udu Zala : आकाशाला गवसणी घालत इंद्रा करणार प्रपोज, मिळणार का दिपूचा होकार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha