![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kareena Kapoor Corona Positive: कोरोनाची लागण झाल्यानंतर करिनाची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाली...
Kareena Kapoor Corona Positive: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) यांना कोरोनाची लागण झाली आहे.
![Kareena Kapoor Corona Positive: कोरोनाची लागण झाल्यानंतर करिनाची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाली... kareena kapoor first reaction after covid positive report share instagram post Kareena Kapoor Corona Positive: कोरोनाची लागण झाल्यानंतर करिनाची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/13/611ddf9359167789e0c9334478043a7d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kareena Kapoor Corona Positive: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले आहेत. करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत, त्या सर्वांचे आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केलीय. कोरोनाची लागण झाल्यानंतर करिनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून करिनाने तिच्या संपर्कात आलेल्यांना विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे.
करिनाची सोशल मीडिया पोस्ट
करिनाने पोस्टमध्ये लिहीले, 'मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी सर्व मेडिकल प्रोटोकॉल्स फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी ही विनंती. माझ्या कुटुंबाने आणि स्टाफने लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षण दिसत नाहियेत. माझी प्रकृती सध्या ठिक आहे. '
गेल्या काही दिवसांत करिना अनेक पार्ट्यांमध्ये उपस्थित होती. त्यामुळे करिना आणि अमृता या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्या सूपर स्प्रेडर ही ठरू शकण्याची शक्याता सूत्रांनी व्यक्त केलीय. मुंबई महानगरपालिकेने त्या दोघींची ट्रॅव्हल हिस्ट्री देखील चेक केली आहे.
महापौर किशोरी पेडणेकरांनीदेखील व्यक्त केला संताप
किशोरी पेडणेकर म्हणाल्या,"बॉलिवूडकरांनी नियम पाळायला हवेत. तसेच राजकिय लोकांनीदेखील नियमांचे पालन करायला हवे. ग्रॅन्ड हयातमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नियम मोडले जात आहेत. बॉलिवूड आणि राजकिय क्षेत्रातील लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा सध्या होम क्वारंटाईन आहेत. दोघींवर पालिकेचं लक्ष आहे. करिना कपूरला दोन लहान मुलं आहेत, तरी इतकं बिनधास्त".
संबंधित बातम्या
बॉलिवूडला कोरोनाचा विळखा, करीनानंतर संजय कपूर आणि सोहेल खानच्या पत्नीला कोरोनाची लागण
Kangana Ranaut : कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा, गीतकार जावेद अख्तर यांची अंधेरी दंडाधिकारी कोर्टाकडे मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)